spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gautami Patil, नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन…

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात (Dhule) बेवारस अवस्थेत सापडले होते.

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात (Dhule) बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीला यासंदर्भात माहिती मिळताच तिने त्यांना पुण्यातील (Pune) चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (Rabindra Baburao Patil) असे आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. पुण्यातील (Pune) चिंतामणी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौतमी पाटीलचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले असून ती तिच्या आईकडे राहते. गौतमी पाटील लोकप्रिय झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचे वडील माध्यमांवर झळकले होते. त्यावेळी लेकीबद्दल बोलताना ते म्हणालेले,”मला माझ्या लेकीची आठवण येत आहे. तिच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे याच वडील म्हणून आनंद आहे. पण तिच्यावर टीका होते तेव्हा वाईट वाटतं”.

वडील बेवारस अवस्थेत असल्याचं गौतमीला कळताच तिने याची दखल घेत त्यांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी ती म्हणाली होती,”माझ्या वडीलांनी आमच्यासाठी कधी काही केलं नसलं तरी माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करेल आणि वडीलांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी नक्कीच घेईन”. पुण्याआधी गौतमीच्या वडिलांवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गौतमी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती. आता त्यांचे निधन झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा: 

रामदास आठवलें म्हणाले, फडणवीसांचा कुठलाही हात नाही…

भाजप विरोधी इंडिया आघाडीला शह देण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss