Gharoghari Matichya Chuli: जानकी-ऋषिकेशच्या लग्नसोहळ्यातील खास लूकने वेधले सर्वांचे लक्ष

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत मेहंदी हळद आणि संगीत पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती विवाहसोहळ्याची. जानकी आणि ऋषिकेशने या लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली असल्याचं पाहायला मिळत आहे.

Gharoghari Matichya Chuli: जानकी-ऋषिकेशच्या लग्नसोहळ्यातील खास लूकने वेधले सर्वांचे लक्ष

सध्या मराठी मालिकाविश्वातील एक लग्नसोहळा बराच चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत लग्नसराईचा सोहळा चालू आहे. ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेत ऋषिकेशच्या भूमिकेत सुमित पुसावले (Sumeet Pusavale) तर जानकीच्या भूमिकेत रेश्मा शिंदे (Reshma Shinde) भूमिका साकारताना दिसत आहेत. या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकदा लगीनगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठीचे विविध कार्यक्रम सध्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या लग्नाच्या धामधुमीत इतर मालिकांमधील कलाकार देखील सहभागी होताना दिसत आहेत.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मेहंदी हळद आणि संगीत पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती विवाहसोहळ्याची. जानकी आणि ऋषिकेशने या लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोनेरी रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने परिधान करत जानकी वधूच्या रूपात सुंदर नटली आहे तर ऋषिकेशचाही सोनेरी रंगाचा पेहराव लक्ष वेधून घेणारा आहे.

जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्रही डिझाईन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट घातले आहे. या लग्नाचा थाट लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळेच पेहरावही हटके करण्याचा प्रयत्न दिसतोय. या विवाहसोहळ्यातल्या या लूकमधील सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली की, “गेल्या दहाबारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे. आम्हा कलाकारांसोबत सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखील कसरत सुरु आहे. प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचंच कौतुक आहे. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.”

हे ही वाचा:

कसं काय पाटील बरं हाय का? आमी काय ऐकलं ते खरंय का ?

Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version