spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Godavari : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गोदावरी’चा ट्रेलर लॉंच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकताच 'गोदावरी' (Godavari) सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकताच ‘गोदावरी’ (Godavari) सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले,” नद्या जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आम्ही आता नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबवली आहे”.

‘गोदावरी’ सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ‘इफ्फी २०२१’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘गोदावरी’ या सिनेमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. ‘वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि ‘न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘एशिया पॅसिफिक प्रीमिअर’ही दाखवण्यात आला आहे. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

 ट्रेलर लॉंच दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले,”गोदावरी’ सारखा सिनेमा केल्याबद्दल जितेंद्र जोशीचे अभिनंदन. ‘गोदावरी’शी नातं सांगणारा हा एक सुंदर सिनेमा आहे.११ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत”.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,”संस्कृती आणि सभ्यता याचा थेट संबंध नदी आहे. पण मधल्या काळात आपल्या नद्या आणि आपले विचारही प्रदूषित झाले आहेत. यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही नाही. ‘गोदावरी’ हा सिनेमा नदी भोवती फिरतो. तसेच एका व्यक्तीची कहाणी गुंफून एक चांगला आशय देण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचं जीवन या सिनेमाशी रिलेट करेल”.

‘गोदावरी’ हा सिनेमा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ११ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर ‘गोदावरी’ सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा :

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, उद्यापासून पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ

Gujarat Morbi Bridge Collapse : पर्यंटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरला ‘मृत्यू’चा सापळा; प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss