‘गॉडफादर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांवर चित्रपटप्रेमी भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. ‘सध्या लोकं बॉलिवूडवर प्रचंड नाराज असल्याने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली ही दरी वाढत चालेली दिसत आहे.

‘गॉडफादर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांवर चित्रपटप्रेमी भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. ‘सध्या लोकं बॉलिवूडवर प्रचंड नाराज असल्याने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली ही दरी वाढत चालेली दिसत आहे. पण आता ही दरी येत्या दसऱ्याला भरून निघणार आहे. दक्षिणेतला एक मोठा सुपरस्टार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मोठा सुपरस्टार एकाच चित्रपटात दिसणार आहेत.

पुष्पा’, ‘RRR’, ‘KGF’, ‘विक्रम’ अशा चित्रपटांनी बॉलिवूड दणाणून सोडले असल्याची चर्चा सतत सोशल मीडियावर होत असते. परंतु आता मेगास्टार चिरंजीवी आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे दोघे एका बिग बजेट चित्रपटात एकत्र झळकताना दिसून येणार आहे. म्हणजेच हे दोन्ही कलाकार आपल्याला गॉडफादर या चित्रपटामधून दिसून येणार आहेत. येत्या ५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकताच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा एक टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीजर पाहून सगळ्यांनाच या सिनेमाबद्दल उत्सुकता लागली आहे. टीझरमध्ये नेहमीप्रमाणेच चिरंजीवी हे त्यांच्या डॅशिंग अवतारात दिसत आहेत. याबरोबरच अभिनेत्री नयनतारादेखील यामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरच्या शेवटी सलमान खानची एक छोटीशी अँक्शन झलक बघायला मिळत आहे.

टीझरवरून तरी हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असाच वाटत आहे. शिवाय देशातले एवढे मोठे सुपरस्टार एकत्र दिसणार असल्याकारणाने त्यांचे चाहतेदेखील यासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट मोहनलाल यांच्या मल्याळम ‘लुसिफर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ सिनेमातली पृथ्वीराज सुकुमारनची भूमिका सलमान खान साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा करणार आहेत. शिवाय सलमान खान प्रथमच एका तेलुगू चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सध्या सलमानचे ‘टायगर ३’ आणि ‘भाईजान’ हे दोन्ही चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सध्या तरी या चित्रपटाच्या टीजरमुळे बॉलिवूडप्रेमी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियावर सगळेच या चित्रपटाचं स्वागत करत आहेत. चिरंजीवी आणि दबंग सलमान हे दोन सुपरस्टार प्रेक्षकांचे सिनेमागृहात किती मनोरंजन करू शकतील हे पाहणे गरजेचे ठरेल ?

 

हे ही वाचा :-

विरोधी पक्षाकडून सत्ताधारी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

ओबीसी आरक्षण सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करणार, पुढील सुनावणी लांबीवर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version