‘गॉडफादर’ चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज, साऊथ स्टार चिरंजीवी आणि सलमान खानमुळे उत्सुकता पोहोचली शिगेला

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, 'गॉडफादर' 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

‘गॉडफादर’ चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज, साऊथ स्टार चिरंजीवी आणि सलमान खानमुळे उत्सुकता पोहोचली शिगेला

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गॉडफादर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनंतपूरमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. तेव्हापासून चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान देखील दिसणार आहे.

त्याचबरोबर चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच या चित्रपटाची कथा काय आहे, याचा अंदाज बांधता येतो. चित्रपटात राज्याचे मुख्यमंत्री पीकेआर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या मुलीला (नयनतारा) सत्तेत रस नाही, पण त्यांचा जावई (सत्य देव) आणि पक्षातील इतर काही जण सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. दिग्गज नेत्याचा विश्वासू ब्रह्मा (चिरंजीवी) नंतर मैदानात उतरतो आणि लोभी लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

चिरंजीवीने ब्रह्मासोबत ‘गॉडफादर’ म्हणून दमदार अभिनय केला आहे. पडद्यावर सलमान खानची उपस्थिती चित्रपटाच्या वैभवात भर घालते. दोन सुपरस्टार्सना पडद्यावर एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी अगदीच आनंदाचे ठरणार आहे. नयनतारा आणि सत्य देव देखील आपापल्या भूमिका उत्तमरित्या साकारताना दिसत आहेत.

मोहन राजा दिग्दर्शित या चित्रपटात नीरव शाहने सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे, तर एसएस थमनने आपल्या पार्श्वसंगीताने दृश्ये जिवंत केली आहेत. चिरंजीवीचा प्रत्येक संवाद दमदार आहे. या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी आणि सुपरस्टार सलमान खान पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत, जे चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

दिग्दर्शक मोहन राजा यांनी दोन्ही स्टार्सच कधीही न पाहिलेल व्हर्जन लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, ‘गॉडफादर’ 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

एकता कपूरच्या अडचणीत वाढ XXX मालिकेनंतर होतेय पद्मश्री परत घेण्याची मागणी

वरूण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटलीस येणार, पोस्टर आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version