Golden Globes 2023 Winners List, सातासमुद्रा पार होणार भारतीय चित्रपटाचा सन्मान

आर आर आर या सिनेमाने नवीन वर्षात दमदार बाजी मारली आहे. आर आर आर हा सिनेमा साऊथचे दिग्ग्ज दिग्दर्शक राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात जुनियर एन टी आर रामा राव, आणि राम चरण यांनी १९२० काळातील ब्रिटीश राजवटीतील भारतीय सैनिकांची भूमिका साकारली होती.

Golden Globes 2023 Winners List, सातासमुद्रा पार होणार भारतीय चित्रपटाचा सन्मान

आर आर आर या सिनेमाने नवीन वर्षात दमदार बाजी मारली आहे. आर आर आर हा सिनेमा साऊथचे दिग्ग्ज दिग्दर्शक राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात जुनियर एन टी आर रामा राव, आणि राम चरण यांनी १९२० काळातील ब्रिटीश राजवटीतील भारतीय सैनिकांची भूमिका साकारली होती. दोघांनीही उत्कृष्ट काम केले होते. त्यांच्या गाण्यावरील नाच भारतात प्रसिद्ध झाला होता. तसेच या चित्रपटात आलिया भट्ट (ALIA BHAT ), श्रिया सारण (Shriya Saran), (Samuthirakani) स्मूथीरकानी, अजय देवगण (ajay devgan ) या मोठ्या स्टार मंडळींनी सुद्धा काम केले आहे.

या सिनेमाने लोकांच्या मनावर राज्य केले. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट गृह (theatre) गच्च भरलेले असायचे. यातील नाटु नाटु (natu natu) गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तब्बल १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने लोकांच्या मनावर ठसे उमटवले पण, भारतासाठीही अभिमानास्पद गोष्ट मिळवली. आर आर आर चित्रपाटाच्या या गाण्याने गोल्डन ग्लोब २०२३ विजेता पुरस्काराचा ‘किताब’ मिळवला आहे. अलिकडे हा चित्रपट ऑस्कर (OSCAR) च्या शर्यतीत होताच परंतु आत या चित्रपटाने अतुलनीय कामगिरी केली. सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी गोल्डन ग्लोब (GOLDEN GLOB) पुरस्कार मिळाला आहे. भारतीय संगीतविश्व आणि चित्रपटविश्वासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.

गोल्डन ग्लोब २०२३ या पुरस्कारात दिग्दर्शक राजामौली, त्यांची पत्नी उपासना कामिनेनी यांच्यासह ज्युनिअर एनटीआर (JUNIOR N. T. R.) आणि राम चरण (RAM CHARAN) गोल्डन ग्लोब्समध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. हे यश मिळाल्यानंतर त्यांचा आनंद अवरेनासा झालाय. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिनेमातील कास्टने ऑडिटोरियममध्ये एकच जल्लोष केला. आरआरआर (RRR ) सिनेमातील कलाकारांचा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भारताच्या ‘आरआरआर’ चा डंका पाहायला मिळाला.

हे ही वाचा:

आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

पडद्यावरची ‘गोड आजी’ हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version