Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Patal Lok 2 : क्राइम आणि थ्रिलर सीरिज चाहत्यांसाठी खूशखबर; ‘पाताळ लोक २’ लवकरच भेटीस

अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांची निर्मिती असलेली ‘पाताल लोक’ ही क्राईम-थ्रीलर सीरिज प्रचंड गाजली होती. सिरिजचा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला सीझन रिलीज झाल्यानंतर लगेच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची मागणी चाहत्यांनी लावून धरली होती. दुसरा सीझन पाहण्यास उत्सुक असाल तर एक गुडन्यूज आहे. ‘पाताल लोक २’ लवकरच येणार आहे. लवकरच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं शूटींग सुरू होणार असल्याचा दावा केला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaideep Ahlawat (@jaideepahlawat)

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा तर आदित्य ठाकरे करणार मराठवाडा दौरा

जयदीप अहलावत यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ‘पाताळ लोक २’ बद्दल मोठे अपडेट दिले आहेत. जयदीपने मालिकेच्या शूटिंग शेड्यूलबद्दल खुलासा केला आहे. या मालिकेत पोलीस हत्तीरामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने पुढील सीझनचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होत असल्याचे सांगितले. जयदीप अहलावत यांनी सांगितले की, ‘पाताळ लोक २’ येत्या १० दिवसांत सुरू होणार आहे. आता ४ महिने, साडेचार महिने अधोलोकात टाच घासल्या जातील. हा एक गंभीर विषय आहे आणि सुंदर लिहिले आहे. माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असून, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

Michael Jackson : मायकेल जॅक्सनला ब्रिटनच्या राजकुमारी सोबत लग्न करायचे होते, खुलासा केला बॉडीगार्डने

‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत होते. याशिवाय नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ही वेबसीरिज हाथीराम चौधरी या एका पोलिस अधिका-याची कथा आहे. दिल्लीत यमुनाच्या पूलावर चार आरोपींना पकडले जाते. यांच्यावर एका टॉपचा पत्रकार व न्यूज अँकर संजीव मेहरा (नीरज काबी)च्या मर्डरचा कट रचल्याचा आरोप असतो. हे प्रकरण पोलीस हाथीराम चौधरी (जयदीप अल्हावत)ला दिले जाते. हाथीराम पोलीस ठाण्यात काम करणारा साधारण पोलीस असतो. पण या एका प्रकरणाच्या निमित्ताने हाथीरामला आता स्वत:ला सिद्ध करायचं असतं. मी हिरो आहे, हे पोलिस डिपार्टमेंटलाच नाही तर स्वत:च्या कुटुंबालाही त्याला दाखवून द्यायचं असतं. तो यात यशस्वी होतो की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसीरिज बघावी लागेल.

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपचं नवं फिचर अनोखे ! घ्या जाणून संपूर्ण माहिती

Latest Posts

Don't Miss