सिनेरसिकांना खुशखबर ! National Cinema Day निमित्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा जॅकपॉट

मल्टिप्लेक्समध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चित्रपटरसिकांना हा एक प्रकारचा जॅकपॉटच ठरणार आहे.

सिनेरसिकांना खुशखबर ! National Cinema Day निमित्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा जॅकपॉट

उद्या दि.२० सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी नवीन उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने यंदाही सिनेरसिकांना खास निर्णय देण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घेतला आहे. चक्क मल्टिप्लेक्समध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चित्रपटरसिकांना हा एक प्रकारचा जॅकपॉटच ठरणार आहे.

चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. आठवड्याच्या सुट्टीला सहकुटुंब सिनेमा पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातही काही जणांना सिनेमागृहाचं तिकीट परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही काहींना घरीच सिनेमा पाहावे लागतात. पण अशा सिनेरसिकांना एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

यावर्षी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ ची घोषणा करण्यात आली आहे. २० सप्टेंबरला ४००० हुन अधिक स्क्रिनवर हा दिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी चित्रपटांच्या तिकिटांची किंमत केवळ ९९ रुपये असणार आहे. ही ऑफर केवळ ३ डी, रिक्लायनर सिनेमा स्क्रीनमध्ये लागू नाहीये. त्यामुळे शुक्रवारी २० सप्टेंबरला प्रेक्षकांना ९९ रुपयात कोणताही सिनेमा पाहता येणार आहे.

दिल्या जाणाऱ्या या ऑफरमुळे सिनेमांना फायदा होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील ‘नवरा माझा नवसाचा २’ हा बहुचर्चित सिनेमा २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. नवरा माझा नवसाच्या २ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ९९ रुपये तिकीटामुळे हाऊसफुल प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर तसेच ‘द बकिंगहॅम मर्डर’, ‘लैला मजनू’, ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’, ‘तुंबाड’ ‘रहना है तेरे दिल में’ हे सिनेमा देखील तुम्ही यावेळी चित्रपटगृहात पाहू शकता. त्यामुळे आता ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती गर्दी करतायेत हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी

‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version