Goodbye : ‘गुडबाय’ला बायकॉट करा’; हिंदुस्तानी भाऊची मागणी…

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि रश्मिका 'गुडबाय'चं चांगलचं प्रमोशन करत आहेत.

Goodbye : ‘गुडबाय’ला बायकॉट करा’; हिंदुस्तानी भाऊची मागणी…

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या ‘गुडबाय’ (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि रश्मिका ‘गुडबाय’चं चांगलचं प्रमोशन करत आहेत. अशातच या सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) एक व्हिडीओ शेअर करत ‘गुडबाय’ सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे.

हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ‘गुडबाय’ सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणतोय,”दोन वर्षांपूर्वी ‘एक था कबूतर’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैन्यदल, त्यांचे कपडे आणि कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी मी आवाज उठवला होता आणि मला संपूर्ण देशाने मदत केली होती. त्यामुळे आज तुम्हीदेखील ‘गुडबाय’ सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी करू शकता”. हिंदुस्तानी भाऊ पुढे म्हणाला,”भारतीय सैन्यदल आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं गरजेचं आहे. धर्माची चेष्टा-मस्करी करणाऱ्या सर्व गोष्टींना आपण बायकॉट केलं आहे. त्याचप्रमाणे सैन्य, पोलिस यांची जर कोणी मस्करी करत असेल तर मी त्यांना सोडणार नाही. आज त्यांच्यामुळे आपण सण साजरे करू शकतो”. हिंदुस्तानी भाऊचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे #boycottgoodbye देखील ट्रेडिंगमध्ये आहे.

यापूर्वी ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षा बंधन’, ‘दोबारा’ अशा अनेक चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सोडल्यास गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेला एकही बॉलिवूड चित्रपट चांगली कमाई करू शकलेला नाही. आता त्या यादीत ‘गुडबाय’चा समावेश होतोय का, हे येत्या काही दिवसातच समजेल.

‘गुडबाय’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एकता कपूरचा सहभाग आहे. मात्र गेले काही दिवस ती वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. एकता कपूरच्या वेब सीरिज ‘थ्री एक्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यामध्ये सैनिकांच्या पत्नींशी संबंधित आक्षेपार्ह दृश्यही होते. वेब सीरिजमधील एका दृश्यात, जेव्हा भारतीय जवान ड्युटीवर असतो, तेव्हा त्याची पत्नी लष्करी गणवेश घालून मित्रांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

बेंगळुरूमध्ये ओला, उबेर, रॅपिडो ऑटो ठरवण्यात आल्या बेकायदेशीर; ३ दिवसात होणार सेवा बंद

Thackeray vs Shinde : ठाण्यात शाखेच्या वादावरून शिंदे – ठाकरे आमने सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version