spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पूनम पांडेला सरकार देणार मोठी जबाबदारी,आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही तिच्या खोट्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती.

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही तिच्या खोट्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पूनमचं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने निधन झालं आहे, असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर पूनमनं स्वत: चा एक व्हिडीओ शेअर करुन ती जिवंत असल्याचं सांगितलं. या सर्व प्रकरणानंतर पूनमचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल केलं.मात्र तिने केलेली हा स्टंट फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.आता पूनम पांडेला केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठी जबाबदारी देऊ शकते. याबाबत पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात चर्चा सुरु आहे.

 केंद्र सरकार पूनमला सर्वाइकल कर्करोग जनजागृतीच्या मोहिमेसाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर बनवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘पीटीआय’या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पूनम पांडे आणि तिची टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करत आहे. पूनम पांडे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत सरकारच्या सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची ब्रँड ॲम्बेसेडर बनू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला पूनम पांडेच्या पीआर टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी पोस्ट केली होती. अभिनेत्रीचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले. अभिनेत्रीच्या आजारपणामुळे अचानक मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी खोटी असल्याचे तिने स्वत:चं व्हिडिओ शेअर करत सांगितले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पूनमने हा स्टंट केला असल्याचे तिने सांगितले. 

3 फेब्रुवारी रोजी पूनम पांडेने एक व्हिडिओ पोस्ट करून ती जिवंत असल्याची माहिती दिली होती. ती म्हणाली- ‘मला असे करण्यास भाग पडले. मी तुमच्या सर्वांसोबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर करत आहे, मी इथे आहे, जिवंत असल्याचे तिने म्हटले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने माझा जीव घेतला नाही, परंतु या आजाराचा सामना कसा करावा याबद्दल माहिती नसल्यामुळे हजारो महिलांचे प्राण घेतले असल्याकडे पूनमने आपल्या इन्स्टा व्हिडीओमध्ये म्हटले. पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. आपल्या बोल्ड अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये ‘नशा’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

हे ही वाचा:

शरद पवार गटाला नवीन पक्षाचं नाव मिळालं, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ नवं नाव

अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर, श्रीरंग गोडबोले यांच्यासह नवीन वेबसीरिजची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss