Pooja Hegde birthday : ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर पूजा हेगडेच्या बर्थडेचं जोरदार सिलेब्रेशन, पहा हा व्हिडिओ

Pooja Hegde birthday : ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर पूजा हेगडेच्या बर्थडेचं जोरदार सिलेब्रेशन, पहा हा व्हिडिओ

दक्षिण भारतीय चित्रपटांची सुपर हॉट अभिनेत्री पूजा हेगडेने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ही अभिनेत्री आज म्हणजेच १३ ऑक्टोबरला तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. पूजाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९० रोजी मुंबईत झाला. तिनं साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्याच्या जोरावर त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. अर्थात पूजाचा जन्म मुंबईत झाला, पण अभिनेत्रीचे कुटुंब कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील आहे. पूजाला तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून फॅशन आणि मॉडेलिंगची आवड होती, त्यामुळे ती अनेकदा फॅशन शो आणि डान्स शोमध्ये भाग घेत असे. लहानपणापासूनच फॅशन आणि नृत्याकडे कल असल्याने पूजाला पुढे काय करायचे आहे हे माहीत होते. पूजाच्या या छंदांनी तिला चित्रपटांच्या रंगीबेरंगी दुनियेत आणले, पण तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.

हेही वाचा : 

T20 World Cup: दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा ३० धावांनी पराभव, राहुलच्या खेळीवर पाणी फेरले

पूजाने तिचा यंदाचा वाढदिवस तिचा आगामी चित्रपट ‘ किसी का भाई किसी की जान’ च्या टीमसोबत वाढदिवस साजरा केला. सलमान खान आणि व्यंकटेश दग्गुबती यांनी तिच्यासाठी वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्या दिल्या. चित्रपटाच्या सेटवर वाढदिवसाचा केक कापला. या छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये अभिनेता जस्सी गिलही उपस्थित होता.

रणवीर सिंग आणि दीपिका लवकरच घेणार घटस्फोट ; या अफवांवर अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोडले मौन

सलमान खान फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान आणि व्यंकटेश पूजामध्ये सामील होत असताना तिने तीन वाढदिवसाचे केक कापले आहेत. तिने दोन स्टार्सना केक भरवला. नंतर, व्हिडिओमध्ये आपण सलमानला “सुंदर, सुंदर” असे म्हणताना व्हिडिओ ऐकू येत आहे. कॅप्शनसह शेअर करत, “#KisiKaBhaiKisiKiJaan च्या टीमकडून भव्य @hegdepooja ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” असे म्हटले.

मुंबईत रविवारपासून जमावबंदी

Exit mobile version