‘कॉफी विथ करण शो’ मध्ये आर्यनच्या ड्रग्स प्रकरणावर बोलणार गौरी खान

या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहेत. ज्यांनी आपली मते मांडली आहेत. आपल्या वयक्तिक आयुष्याविषयी सांगितले आहे.

‘कॉफी विथ करण शो’ मध्ये आर्यनच्या ड्रग्स प्रकरणावर बोलणार गौरी खान

कॉफी विथ करण शो

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये मोठं मोठ्या गोष्टींचा उलगडा होतो. नुकताच या शोचा सातवा सीजन सुरु झाला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने हा शो होस्ट करून शो ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. नुकतीच या शो मध्ये अभिनेता शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान ह्यांनी हजेरी लावली. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहेत. ज्यांनी आपली मते मांडली आहेत. आपल्या वयक्तिक आयुष्याविषयी सांगितले आहे. रणवीर सिंग आणि आलियाने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही गोष्टींचा उलगडा केला आहे. तर सारा अली खान देखील या शो मध्ये येऊन गेली होती. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार गौरी खान पहिल्यांदाच आर्यन खानच्या प्रकरणाविषयी बोलताना दिसेल.

हेही वाचा :

देशातील ‘मंकिपॉक्स’चा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आर्यन खानला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. त्याची चौकशी देखील झाली. त्यानंतर आर्यनला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले. व त्याचा पासपोर्ट देखील परत करण्यात आला. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी याविषयावर बरेच दिवस मौन पाळले होते. पण कॉफ़ी विथ करण या शो च्या निम्मिताने गौरी याबाबत पहिल्यांदा बोलणार आहे.

हेही वाचा :

सुष्मिता सेन व ललित मोदींच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

असं म्हटलं जातय कि, करण जोहर गौरीला आपली मोठी बहीण मानतो. त्यामुळे या शोमध्ये ती व्यक्त होऊ शकेल. करण जोहर च्या शो मुळे अनेक गुपितं बाहेर आली आहेत. आता आर्यन खानच्या या प्रकरणाविषयी या शो निम्मिताने कळेल. आणि गौरी आणि शाहरुख खान ड्रग्ज प्रकरणावर उघडपणे बोलणार आहेत. यातून काही गोष्टी नव्याने कळेल, हे नक्की.

 

Exit mobile version