Gulabjam 2, सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ चांदेकरसोबत नाही तर दिसणार ‘या’ अभिनेत्यासोबत

मराठी चित्रपटसृष्टीतील गुलाबजाम चित्रपट सर्वांना आठवतच असेल. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची धमाल जोडी पहायला मिळाली होती. गुलाबजाम हा चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे सर्वांना आवडला.

Gulabjam 2, सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ चांदेकरसोबत नाही तर दिसणार ‘या’ अभिनेत्यासोबत

मराठी चित्रपटसृष्टीतील गुलाबजाम चित्रपट सर्वांना आठवतच असेल. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची धमाल जोडी पहायला मिळाली होती. गुलाबजाम हा चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे सर्वांना आवडला. हा चित्रपट कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात भरला. त्यातच आता गुलाबजाम चित्रपटाच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. गुलाबजाम चित्रपटाचा सिक्वेल (sequel) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिक्वेलमधुन सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट झालाय.

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या गुलाबजाम हा चित्रपटाने संपूर्ण भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर (box office) खूप कमाई केली. हा एक सुपरहिट चित्रपट ठरला. त्यातच आता सचिन कुंडलकरच्या बहुप्रतिक्षित गुलाबजाम २ ची घोषणा झाली आहे. पहिल्या भागामध्ये म्हणजेच गुलामजाम चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णीची जोडी दिसून आली होती. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये वैभव तत्ववादी आणि सोनाली कुलकर्णीची जोडी झळकणार आहे. गुलाबजाम २ बद्दल बोलताना वैभव म्हणाला, “देव खरोखरच दयाळू आहे आणि अशा नेत्रदीपक प्रकल्पांचा भाग असल्याची घोषणा करताना खूप आनंद वाटतो! सचिन कुंडलकर सोबत काम करणे हा नेहमीच एक चांगला अनुभव राहीलाय माझ्यासाठी.सोनालीसोबतचा हा माझा पहिला चित्रपट असेल आणि गुलाबजाम २ सोबत आम्ही कशाप्रकारे जादू निर्माण करतो याची मी खरोखरच वाट पाहत आहे.”

वैभव गुलाबजाम २ साठी कसुन मेहनत घेत आहे. याशिवाय गुलाबजाम २ च्या सिक्वेलमधुन सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट झालाय का? अशीही चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरम्यान गुलाबजाम २ ची घोषणा झाल्यापासुन चाहत्यांना फार आनंद झाला आहे, प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. वैभव काही महिन्यांपुर्वी निर्मल पाठक की घर वापसी या कौटुंबिक वेबसिरीजमध्ये दिसला होता. वैभव तत्ववादीने अलीकडेच बहुचर्चित एक्शन थ्रिलर कमांडोचा भाग असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आता तो लवकरच गुलाबजाम २ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो सोनालीसोबत काय जादू दाखवणार हे पाहणे आणि ही जोडी प्रेक्षकांना आवडेल का हे लवकरच समजेल.

Exit mobile version