spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uorfi Javed उर्फी जावेदला बिहारमधून धमकावत होता तरुण, मुंबई पोलिसांकडून अटक

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी (urfi javed) जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. उर्फी जावेद कधी कोणती फॅशन करेल हे कोणाला माहित नसते. आणि तिच्या कपडण्यांमुळे सतत ट्रोल होत असते. तसेच काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली होती. बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदला सतत जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या तरुणाला Mumbai Police यांनी अटक केली आहे. या संदर्भात उर्फी जावेद ने Goregaon Police Station ला तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी Bihar येथील Patna येथून नवीन गिरी नावाच्या पोराला अटक केली आहे. उर्फी जावेदने तक्रार केली होती की आरोपी WhatsApp call वरून सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत होता. आणि आरोपी तिच्या फॅशन सेन्स वर देखील बोलत होता.

 

या संभंधित पोलिसांनी सांगितले की, Technical शोध घेतल्यानंतर पाटणा या शहरातील नवीन गिरी नावाचा पोरगा धमकावत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा गाठून नवीन गिरी नावाच्या पोराला अटक केली. नंतर पोलिसांनी सांगितले की पाटणा येथील कोतवाली पोलिसांच्या मदतीने नवीन गिरी याला हॉटेल मध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला मुंबईत घेऊन आले. मुंबईत आल्यावर त्याची नीट चौकशी करण्यात आली. त्याच बरोबर उर्फी जावेदने(urfi javed) इंस्टाग्रामवर सांगितले की, नवीन हा तीन वर्षांपूर्वी तिचा ब्रोकर होता आणि त्याच्याकडे माझा नंबर देखील होता. आणि अचानक नवीने त्या नंबरवर मेसेज पाठवून धमक्या द्याला सुरुवात केली, नवीन त्या नंबरवर कॉल करून उर्फी जावेदला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. अभिनेत्री उर्फी जावेदने (urfi javed) पोलिस स्टेशनला तक्रार नोंद करतांना आरोपीच्या कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना दिले होते.

नवीन गिरी हा पोरगा उर्फी जावेदला विविध नंबर वरून फोन करत असे आणि तिला धमक्या देत असे. आणि उर्फी जावेदने (urfi javed) मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशनला त्या व्यक्ती विरोधात तक्रार केली होती. अभिनेत्री उर्फी जावेदने आरोपी नवीनच्या कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना दिले, त्यानंतर पोलिसांनी नंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. आता नवीनला पकडण्यात आले आहे, पोलिसांनी नवीनच्या विरोधात IT Act आणि धमक्यांचा Under Sec गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासातून असे समोर आले की नवीन हा Real estate broker असल्याचे समोर आले असून त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. नवीनने असा दावा केला आहे की, उर्फी जावेदने त्याचे कमिशन दिले नाही, म्हणून तिला सतत धमक्यांचे कॉल येत असत.

हे ही वाचा : आईची प्रार्थना ऐकली शिक्षकाने, ५०० रुपयांचं रूपांतर झालं ५१ लाखात

 

Latest Posts

Don't Miss