spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Happy Birthday Amruta Khanvilkar : आज वाढदिवसानिम्मित नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’बद्दल घ्या जाणून

'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘मुंबई सालसा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’ म्हणून अमृता ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे. अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची जादू टीव्हीवर चित्रपटांतून दाखवली असून तिच्या अभिनयात ती जशी पुढे आहे, तशीच लेखन अभ्यासाच्या बाबतीतही अमृता कोणाच्याही मागे नाही.

अमृताचे खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी पुण्यात झाला. त्यानंतर तिचे शिक्षण मुंबईत झाले. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हादेखील अभिनेता आहे. तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसून आला आहे. ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमादरम्यान अमृता आणि हिमांशूची भेट झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अमृता आणि हिमांशू १० वर्षे एकमेकांना डेट करत होते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते २४ जानेवारी २०१५ साली लग्नबंधनात अडकले. आजही त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मैत्रीचं नातं आहे. दोघेही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 अमृता खानविलकर यांच्या कुटुंबीयांनी तिला शालेय शिक्षणासाठी पुण्यातील कर्नाटक हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी पाठवले. अमृताने आपले शालेय शिक्षण याच शाळेतून पूर्ण केले. अगदी शालेय दिवसांपासून ती अभ्यासात खूप चांगली विद्यार्थिनी असायची. वाणिज्य हा अमृता खानविलकरचा सर्वात आवडता विषय होता आणि या कारणास्तव तिने तिचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथून वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. ‘कट्यार काळजा घुसली’, ‘शाळा’, ‘साडे माडे तीन’, ‘चोरीचा मामला’ आणि ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमांसह तिने ‘राझी’, सत्यमेव जयते आणि ‘मलंग’ सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती. यासह एकापेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. . चित्रपटांसोबतच अमृताने ‘टाइम बॉम्ब 9/11’, ‘नच बलिए 7’ आणि ‘झलक दिखला जा 8’ यासह अनेक शोमध्ये काम केले आहे. चित्रपट आणि टीव्ही शोशिवाय अमृताने वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

रवी जाधवच्या ‘नटरंग’ या बहुचर्चित सिनेमातील ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण या गाण्यासाठी अमृता पहिली पसंती नव्हती. या गाण्यासाठी एका वेगळ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. पण काही कारणास्तव तिला हा सिनेमा करणं जमलं नाही . त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगच्या एक दिवस आधी अमृताला विचारणा झाली. या गाण्यामुळे अमृताला घराघरांत लोकप्रियता मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 २०१६ साली ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ सारखा छोट्या पडद्यावरील कार्यक्रमदेखील केला. त्यानंतर २०१७ साली तिने ‘डान्स इंडिया डान्स 6’ होस्ट केला. अमृता २०१५ साली ‘झलक दिखला जा’ आणि २०२० मध्ये ‘खतरों के खिलाडी १० ‘ सारख्या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली. २०१७ साली ‘२ मॅड’ आणि २०१८ साली ‘सूर नवा ध्यास नवा’ सारख्या कार्यक्रमांचं तिने परिक्षण केलं.

हे ही वाचा : 

टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

Refinery Project : ठाकरे – फडणवीसांच्या चुकीनं राज्याचं होतयं रोज ५८ कोटींचं नुकसान

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss