Happy Birthday Deepika Padukon, बॉलीवूडच्या मस्तानीचा आज आहे वाढदिवस

Happy Birthday Deepika Padukon : दीपिका प्रकाश पादुकोण (Deepika Padukone) हि बॉलीवूडची (Bollywood) नावाजलेली आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिकाचा जन्म डेन्मार्क येते झाला. २००६ साली ओम शांती ओम या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Happy Birthday Deepika Padukon, बॉलीवूडच्या मस्तानीचा आज आहे वाढदिवस

Happy Birthday Deepika Padukon : दीपिका प्रकाश पादुकोण (Deepika Padukone) हि बॉलीवूडची (Bollywood) नावाजलेली आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिकाचा जन्म डेन्मार्क येते झाला. २००६ साली ओम शांती ओम या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पुढे जाऊन तिच्या कामामुळे तिचे कौतुक होऊ लागले, आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये दीपिका प्रमुख भूमिकेमध्ये दिसू लागली. ओम शांती ओम (OM SHANTI OM ), ये जवानी हे दिवानीये (YE JAVANI HE DIWNNI), बाजीराव मस्तानी (BAJIRAW MASTANI), राम लीला (RAM LILA ) यासारखे दीपिकाचे बरेच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेले आहेत. अश्या ग्लॅमर्स अभनेत्रींचा आज वाढदिवस आहे.

आज ५ जानेवारी रोजी दीपिकाचा वाढदिवस असून चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूड सेलेब्रिटींनीही दीपिकाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका हि २० शतकातील संदर व प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच ती जास्त पैसे घेणाऱ्या नट्यांपैकी एक आहे. गेले १८ वर्ष दीपिका बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. बऱ्याच कारणांमुळे दीपिकावर टीका करण्यात येतात. आताही बेशरम रंग गाण्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिचा पठाण सिनेमा अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहे. असे असताना देखील दीपिकाला बाहेरील देशातून फिफा वर्ल्ड कप २०२२ ट्रॉफीच्या अनावरण करण्याचा मन देण्यात आला. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. हि बाब सर्वच भारतीयांना अभिमानास्पद आहे. दीपिकानं फिफा वर्ल्ड कप २०२२ ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला दीपिकानं ब्लॅक पँट, व्हाइट शर्ट आणि ब्राउन कलरचे लेदर कोट असा लूक केला होता. तिच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. एकीकडे भारतात दीपिकावर टीका केली जाते आणि दुसरीकडे हीच दीपिका फिफा वर्ल्ड कप ( fifa world cup) मध्ये ट्रॉफीचे अनावरण करून येते. अशी शांत, व हुशार अभिनेत्री म्हणून चाहत्यांकडून तिचे कौतुक होते.

दीपिकाचा आज वाढदिवस असून ती ३८ वर्षाची झाली आहे. यशाची बरीच शिखरे तिने आधीच पार केली आहेत. बॉलीवूड मधील सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्रींनमध्ये दीपिकाची नोंद होते. बॉलीवूड मध्ये नव्हेच तर हॉलिवूड मधेही दीपिकाची ख्याती दूरवर पसरली आहे.( XXX: Return of Xander Cage) या परदेशी चित्रपटात तिने काम केले आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच्या विमानाचं करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग

राशी भविष्य, ५ जानेवारी २०२३, सिंह राशीतील व्यक्तींना कामानिमित्ताने…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version