spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील नवं गाणं रिलीज

झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे.

झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘बाजी रं बाजी रं’ गाणं प्रदर्शित झालं आहे.

अभिनेते शरद केळकर हे या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून हे गाणं त्यांच्यावरच चित्रीत झालं आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर जितका दमदार आहे. तितकीच या चित्रपटातील गाणीही रोमहर्षक अनुभव देणारी आहेत. यामधील ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे. मंदार चोळकर हे या गाण्याचे गीतकार आहेत. तर, हितेश मोडक यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर, आपल्या बुलंद आवाजाने मनिष राजगिरे यांनी गाणं गायलं आहे. यातील ‘वाह रे शिवा’ हे गाण्याचा यापूर्वीच विविध म्युझीकल ऍप्सवर चार्टबस्टर लिस्टमध्ये समावेश झाला आहे. युट्युबवरही हे गाणं लाखो प्रेक्षकांनी बघितले असून त्याला आपल्या पसंतीची पावती देत भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

तसेच रिलीज झालेला ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये आणखी एक उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या चाहत्यांना हा ट्रेलर पाहून खूप आनंद झाला आहे. ट्रेलरमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी कथा उत्तम प्रकारे मांडण्यात आली आहे, जी कौतुकास्पद आहे. ट्रेलरमध्ये बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली होणारी एक खरी लढाई, मजबूत आणि प्रेरणादायी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. जिथे केवळ ३०० सैनिकांनी १२,००० शत्रू सैन्याविरुद्ध लढा दिला आणि जिंकला. या विजयासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या संपूर्ण ट्रेलरमध्ये शरद केळकरने संपूर्ण टीझर आपल्या दमदार आवाजाने बांधून ठेवला आहे. त्याच बरोबर त्याचा अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी देखील ट्रेलरमध्ये खूप छान दिसत आहे.

हे ही वाचा:

‘हर हर महादेव’ मध्ये बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार शरद केळकर, फर्स्ट लूक आला समोर…

Har Har Mahadev Trailer: ‘हर हर महादेव’चा ट्रेलर झाला रिलीज, बाजी प्रभूंच्या स्टाईलमध्ये शरद केळकरांची गर्जना

‘या’ मराठी कलाकारांचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss