spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राणादाच्या पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Actor Hardik Joshi and Actress Akshaya Deodhar) हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि आता त्यांची लगीनघाई सुरु खाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्याच सोबत अक्षया देवधर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली. त्यापाठोपाठ आता अक्षयाने बॅचलर पार्टीही साजरी केली आहे. त्यावेळचा एक हटके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिची ही बॅचलर पार्टी अगदीच हटके होती. या बॅचलर पार्टी तिने चक्क दाक्षिणात्य थीम ठेवली होती. इतकंच नाही तर नुकताच तिने या बॅचलर पार्टीच्या वेळचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने तिच्या मैत्रिणींसह ‘रा रा रेड्डी’ या अतिशय गाजत असलेल्या गाण्यावर दक्षिणात्य स्टाईलने ठेका धरलेला पहायला मिळत आहे. यावेळी तिने आणि तिच्या मैत्रिणींनी अगदी दाक्षिणात्य पद्धतीने लुंगी परिधान केली आहे. तसंच केसात गजरा माळलेलाही दिसत आहे.

याआधी हार्दिकने त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत ती दोघं लवकरच श्री. व सौ. होणार असल्याचे संकेत दिले होते. आता अक्षयानेही बॅचरल पार्टीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे यांच्या लग्नाची तारीख काय आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यवसायिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा होत आहेत.

हे ही वाचा:

गॉडफादरच्या ट्रेलर लाँचच्या वेळी सलमान खानने चिरंजीवीला मिठी मारून दिल्या शुभेच्छा

Maidaan : अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट बदलली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss