spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सकाळी-सकाळी प्या कोरफडीचे ज्यूस,आरोग्यासाठी ठरु शकते फायदेशीर

सकाळ सकाळी अनेक जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची इतकी सवय असते की,काहींचा त्याशिवाय दिवसही सुरु होत नाही.

सकाळ सकाळी अनेक जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची इतकी सवय असते की,काहींचा त्याशिवाय दिवसही सुरु होत नाही.पण काहीजण विविध फळांचे ज्यूस देखील पितात.जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे, अनेक जण ज्यूस पिऊन त्यांच्या दिवसाची सुरूवात करतात.कोरफड ही आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्यासोबतच कोरफड आपल्या आरोग्यासाठी तितकीच उपयुक्त आहे. तुम्ही कोरफडचा ज्यूस कधी प्यायला आहात का? जर नसेल प्यायला तर तुमच्या मॉर्निंग रूटीनमध्ये त्याचा समावेश करा. कारण, सकाळची सुरूवात ही कोरफडच्या ज्यूसने केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात  फायदे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

रक्तामधली साखर जर कमी करायची असेल तर कोरफडचा ज्युस पिणं खुप महत्तवाचे आहे.ज्या लोकांना मधुमेह आहे, अशा लोकांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आहारात कोरफड ज्यूसचा समावेश करावा. काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जर तुम्ही ३०० मिलिग्रॅम कोरफडचा ज्यूस दिवसातून दोनवेळा असा ४ आठवड्यांसाठी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.शिवाय, साखरेचे प्रमाण कमी होण्यामध्ये देखील सुधारणा होते. त्यामुळे, मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळची सुरूवात ही कोरफड ज्यूसच्या सेवनाने करणे, फायद्याचे ठरते.

पचनक्षमता सुधारते

कोरफडच्या ज्युसमुळे शरीरातील पचनक्षमतेत सुधारणा होते.कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. शिवाय, कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी देखील असते. सकाळी कोरफडचा ज्यूस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, आपल्या शरीराची पचनक्षमता देखील सुधारते. त्यामुळे, ज्या लोकांना पोटाच्या समस्या किंवा पचनाच्या समस्या आहेत. त्यांनी त्यांच्या मॉर्निंग रूटीनमध्ये, कोरफड ज्यूसचा जरूर समावेश करावा.

शरीराची सूज कमी करते

शरीराची सूज कमी करण्यासाठी कोरफडच्या ज्यूसचा चांगला उपयोग होतो.अनेकांना पित्त झाल्यावर शरीरावर लालसर चट्टे येतात किंवा शरीराला सूज येते. सूज येण्यासोबतच शरीरामध्ये आतून जळजळ होते. अशा स्थितीमध्ये तुम्ही कोरफडच्या पानांचा रस किंवा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला यापासून आराम मिळतो. कोरफडमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म शरीराची सूज कमी करण्यास मदत करतात.

हे ही वाचा: 

नाशिक महामार्गावर गाड्या फोडून केली लाखो रुपये ऐवजाची लूटमार, पोलिसांकडून मोठी कारवाई

छत्रपती शिवरायांची महती सांगणार ‘शिवबाचं गाणं’ प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss