spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बांबू चित्रपटामध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Vaishnavi Kalyankar : वेगवेगळ्या मालिकांमधून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar). कमी वेळेत वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे करून टाकले आहे. अभिनेत्री वैष्णवी (Vaishnavi Kalyankar) आता चित्रपटात पदार्पण करण्यासाठी तयार झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित यांच्या बांबू या चित्रपटातून वैष्णवी मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. तिची पोस्ट नुकतीच सोशल मिडीयावर झळकली आहे.

 

बांबू या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी असे म्हणते की मी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती आनंदी , उत्साही, धाकधूक अश्या भावना देखील ती अनुभवत आहे. यात मी ‘झुळूक’ ची पात्र (character) साकारतेय, जी खूपच निरागस आहे. आजकालच्या तरुणींना ही पात्र (character) अगदी जवळची वाटेल. जसे की ते आपल्या घरातलीच आहे असे वाटेल. एक मालिका करत असताना मी बांबू या चित्रपटा मधील झुळूक साठी ऑडिशन (audition) दिले होते. आणि माझी निवड देखील करण्यात आली होती. प्रॉडक्शनकडून (Production) मला सकाळी ७ वाजता पुण्यात बोलावण्यात आले होते. आमची मिटिंग ५ तास चाललीआणि त्यानंतर बाकीची प्रक्रिया पुढे चालू झाली.

प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), संतोष खेर (Santosh Kher) निर्मित, विशाल देवरूखकर (Vishal Devrukhkar) दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. आता त्यांच्या प्रेमकहाणीत नेमके काय ‘बांबू’ (Bambu Marathi Movie) लागले आहेत, हे चित्रपट आल्यावरच कळेल. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा : ‘Goodachari 2’ असेल आदिवी शेषचा पुढचा चित्रपट, जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता

 

Latest Posts

Don't Miss