‘माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’ म्हणत हेमांगी कवीने केली पोस्ट शेअर

‘माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’ म्हणत हेमांगी कवीने केली पोस्ट शेअर

हेमांगी कवीने केली पोस्ट शेअर

आपल्या उत्तम अभिनयामुळे, नृत्यामुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे हेमांगी कवी ही नेहमीच चर्चेत असते. सिनेविश्वातली एखादी घटना असुदे किंवा एखादा सामाजिक मुद्दा असुदे हेमांगी कवी नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत परखडपणे मांडत आलीय. त्याचमुळे हेमांगीने हल्लीच केलेली तिची सोशल मीडिया पोस्ट देखील आता पुन्हा चर्चेचा विषय बनलीय. या पोस्ट मध्ये तिने, तिचं गेल्यावर्षी गाजलेलं प्रकरण ‘बाई, बुब्स आणि ब्रा व आजच प्रदर्शित झालेला तिचा नवा सिनेमा ‘तमाशा Live’ या दोन्हींची सांगड घालणारी पोस्ट शेअर केली आहे.

एका वर्षापूर्वी चर्चेत असलेल्या पोस्टची आठवण ट्रोलर्स पुन्हा एकदा हेमांगी कवीला करून देत आहेत. आणि याच सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी हेमांगी ही पोस्ट शेअर केल्याचं दिसून येतंय.

हेमांगी कवीने तिच्या या पोस्त्मधून तमाशा Live हा तिचा सिनेमा प्रदर्शित होण्याचा आनंद तर व्यक्त केलाच पण त्याचबरोबर तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा : 

सारा – जान्हवी करत होत्या दोन सख्ख्या भावांना डेट, करण जोहर ने सांगितली नावं

Exit mobile version