Hina Khan ने कापले केस, पण कारण काय?

Hina Khan ने कापले केस, पण कारण काय?

अभिनेत्री हिना खानने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती दिली आहे. हिना खान तिच्या या कठीण प्रवासातील प्रत्येक टप्पा चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे केस कापताना दाखवले जात आहेत.

हिना खान अशा कठीण प्रसंगीसुद्धा पॉसिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिची जिद्ध आणि हिंमत बघून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. हिनाने शेअर केल्या एका व्हिडिओमध्ये हिना केस कापण्यासाठी खुर्चीवर बसली असताना तिची आई रडताना दिसत आहे. हिना तिच्या आईला समजवते आणि म्हणते की, “हे फक्त केस आहेत, आज कापले तर ते पुन्हा वाढतील. आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल.” यांनतर हिनाचे केस कापतानाचा व्हिडीओ शेअर करत तिने एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्यात तिने लिहिले आहे की, “माझ्या आईने ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता ती गोष्ट तिच्या डोळ्यासमोर घडतेय. म्हणून या व्हिडिओत माझ्या आईचा काश्मिरी भाषेतला आवाज तुम्हाला ऐकू येत असेल.”

हिनाने पुढे लिहिले आहे की, “तिथल्या सर्व सुंदर लोकांसाठी, विशेषतः स्त्रियांसाठी ज्या माझ्यासारखीच लढाई लढत आहेत. मला माहित आहे की हे कठीण आहे, आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपले केस हा एक प्रकारे मुकुटचं आहे. जो आपण कधीही काढत नाही. पण जर तुम्हाला अशा कठीण लढाईला सामोरं जावं लागत असेल, जिथे तुम्हाला तुमचे केस, तुमचा अभिमान, तुमचा मुकुट गमवावा लागेल, पण जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. आणि मी जिंकणं हा निर्णय निवडला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वतःला प्रत्येक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सुंदर केस गळायच्या आधीच ते मी कापण्याचा निर्णय घेतला आहे. मला हा मानसिक त्रास आठवडाभर सहन करायचा नव्हता, म्हणून मी हा माझ्या केसांचा मुकुट सोडायचा निर्णय घेतला आहे. मला समजले आहे की माझा खरा मुकुट हे माझे धैर्य, माझी शक्ती आणि माझं स्वतःवर असलेले प्रेम आहे. या प्रवासासाठी मी माझे स्वतःच्या केसाचा एक सुंदर विग बनवण्यासाठी वापरायचे ठरवले आहे.”

 

हे ही वाचा:

 
Vasant More बांधणार शिवबंधन ? ; भेटीत काय घडले
 
ICC T 20 World Cup 2024: PM मोदींची भेट घेण्यासाठी भारतीय संघ निवासस्थानी हजर
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version