हिंदी ‘बिग बॉस सिझन १६’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

हिंदी ‘बिग बॉस सिझन १६’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

सलमान खानचा बिग बॉस सिझन १६ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या नव्या सिझन मध्ये प्रेक्षकांना नवीन नवीन ट्विट्स पाहायला मिळणार आहे. तसेच बिग बॉसचा नवा प्रोमो रिलीझ झाला आहे. या नव्या सिझन मध्ये आपल्याला एका नवीन अंदाज मध्ये ड्रामा आणि मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. बिग बॉस १ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे सांगण्यात आले आहे. या सिझन मध्ये बऱ्याच कलाकारांची नावे समोर आली आहे. मात्र या नावांमुळे हा शो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

हे ही वाचा : अभिनेत्री मोनालिसाचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते झाले घायाळ

 

तसेच बिग बॉस या शोची प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उसुक्ता लागली आहे. हा प्रोमो रिलीज झाल्यानंतर या शो मध्ये काहीतरी नवीन घडणार आहे. तसेच या खेळामध्ये नवीन नियम पाहायला मिळणार आहे. यंदा खेळाच्या अंदाज मधे खेळाचा एकच नियम की कोणताही नियम नाही. असे म्हंटले गेले आहे. त्यामुळे यंदाचा सिझन मध्ये काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे.

या शो बद्दल दरवर्षी प्रमाणेच प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळाली आहे . तसेच बिग बॉस १६ सिझन यामध्ये बऱ्याच प्रसिद्ध सेलेब्रिटीनची नावे समोर आली आहे. तसेच मीडियाच्या रिपोर्टनुसार मनोरंजन विश्वातील अनेक लोकांना संपर्क साधण्यात आला आहे. बिग बॉस १६ सिझनमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची नावे विवियन डिसेना , जन्नत जुबेर , फहमान खान , शिवांगी जोशी , फैसल शेख , मुनव्वर फारुकी , पूनम पांडे , मुनमुन दत्ता , हर्षद चोप्रा , नुसरत जहाँ या कलाकारणांची नावे चर्चेत आहे.

बिग बॉसचे घर हे नेहमी प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. नव्या सेलिब्रेटी , नवे घर , आणि नव्या लुकच्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी प्रेक्षकांना फार उसुक्ता लागली आहे. बिग बॉस चे नवीन घर बनवण्यासाठी ६ महिने लागतात. या वेळी बिग बॉस च्या घराचे लोकेशन बदल्यात आले आहे.

हे ही वाचा :

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

Exit mobile version