spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिटलरने जगाला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, कान्ये वेस्टने केला दावा

कान्ये वेस्ट(Kanye West) हा अमेरिकेतील गायक आहे. हा अमेरिकेतील एक नामांकित रॅपर आहे. सध्या कान्ये वेस्ट हा त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रॅपर कान्ये वेस्टला अमेरिकेत रॅपर ये म्हणून ओळखले जाते. कान्ये वेस्ट याने एका मुलाखतीत वक्तव्य केल होत की “त्याला हिटलर (Hitler ) आवडतो तसेच त्याला ज्यू लोक आवडतात असे म्हणत कान्ये वेस्ट हा कार्यक्रमात अँडॉल्फ हिटलरची (Adolf Hitler) सतत स्तुती करत होता.

कान्ये वेस्टच्या या वक्तव्यानंतर ये हा प्रचंड चर्चेत आला आहे. सोशल मिडीयावर कान्ये वेस्टचा हे विधान करतानाच एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कान्ये वेस्टने हिटलरची आणि त्याच्या नाझी पक्षाची भरपूर स्तुती करत आहे. त्याने सांगितलं की “येला हिटलर आवडतो, ज्यू लोक आवडतात, नाझी (Nazi) देखील आवडतात आणि कान्ये वेस्टने सांगितल की, हिटलरबद्दल त्याला चांगल्या गोष्टी दिसतात, “जसे, त्याने दावा केला, हिटलरने महामार्ग आणि मायक्रोफोनचा शोध लावला.”

कान्ये वेस्टने पुढे सांगितले की, नाझी पक्षाचा नेता म्हणून हिटलरने ६ दशलक्ष ज्यू आणि इतर असंख्य लोकांच्या हत्या केल्या. ज्यात पोलिश, रोमा आणि सिंती लोक, समलिंगी लोक आणि अपंग लोकांचा समावेश होता. आणि आणखी एक गट होता ज्याला हिटलरने लक्ष्य केले होते ते म्हणजे काळे लोक हे कदाचित कमी लोकांना परिचित असेल. हिटलरला काळे लोक निकृष्ट आणि “घाणेरडे” वाटत होते. यूएस होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियमच्या म्हणण्यानुसार, काळ्या जर्मन लोकांना एकाग्रता शिबिरात पाठवण्यात आले, काळ्या मुलांना जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली आणि आफ्रिकन अमेरिकन आणि आफ्रिकन फ्रेंच युद्धकैद्यांना जर्मन अपहरणकर्त्यांकडून बर्‍याचदा वाईट वागणूक दिली गेली, ज्याचा सारांश यूएस होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम मध्ये पाहायला मिळेल असे कान्ये वेस्टने सांगितले.

 

कान्ये वेस्टने हिटलरच्या ‘मीन काम्फ’ (Mein Kampf) या पुस्तकाचे उदाहरण देत सांगितले की हिटलरच्या १९२५ च्या पुस्तक “मीन काम्फ” मध्ये, फ्रेंच सैन्यात सेवा करणाऱ्या जर्मन स्त्रिया आणि आफ्रिकन पुरुष यांच्यातील विवाहामुळे जन्मलेल्या मुलांचे वर्णन करण्यासाठी त्याने “राइनलँड बॅस्टर्ड्स” हा अपमानजनक शब्द वापरला. त्याने वारंवार गोरे आणि कृष्णवर्णीय लोकांमधील आंतरजातीय संबंधांना “देवाविरूद्ध पाप” म्हटले आणि “निम्न मानवतेने संक्रमित” म्हटले.असे म्हणत कान्ये वेस्टने हिटल काळ्या लोकांचा किती तिरस्कार करत होता याचे वर्णन केले आहे.

या मुलाखतीत कान्ये वेस्टने स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेहरा पूर्णपणे झाकून ठेवणारा काळा मुखवटा घातला होता. पण त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आवाजावर आणि शरीराच्या हालचालीवर त्याला ओळखले होते. पण कान्ये वेस्टचा हा विडिओ प्रचंड चर्चेत आहे.

हे ही वाचा : 

मुंबईत आजपासून १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू

तोंडाच्या दुर्गंधी पासून त्रस्त आहात तर करा हे उपाय

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss