तिरंगा उलटा पकडत नोरा फतेहीने केला राष्ट्रध्वजाचा अपमान

बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

तिरंगा उलटा पकडत नोरा फतेहीने केला राष्ट्रध्वजाचा अपमान

Nora Fatehi : बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. नोराच्या या प्रसिद्धीमुळेच तिला कतारमध्ये फीफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कप २०२२ (FIFA World Cup 2022) च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरानं जबरदस्त डान्स केला. नोरानं स्टेजवर भारताचा तिरंगा फडकवत जोरदार जय हिंदच्या घोषणा देखील दिल्या. पण या दरम्यान नोरानं एक घोडचूक केली,ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

व्हिडीओमध्ये नोरा फतेही बोलताना दिसतेय की,भारत भले फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला नसेल पण मी एक भारतीय म्हणूनच या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे,आपल्या भारतीय संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून. नोराचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांमध्येच उत्साह संचारला. नोरासोबत उपस्थित प्रेक्षकही जय हिंदच्या घोषणा देऊ लागले. संपूर्ण स्टेडियम भारत आणि भारताविषयीच्या सुरु असलेल्या जय हिंदच्या घोषणांनी दणाणून गेला. नोरा भारतीय तिरंगा हातात घेऊन फडकवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला खरं. पण…

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दिलबर’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.

हे ही वाचा : 

राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

‘दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ जसं गोंदलं होतं तसं, संजय राऊतांचा हल्लबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version