हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता Chris Hemsworth आरआरआर चित्रपटाच्या प्रेमात

भारताला ऑस्कर मिळवून देणारा आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याला त्याच बरोबर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता Chris Hemsworth आरआरआर चित्रपटाच्या प्रेमात

भारताला ऑस्कर मिळवून देणारा आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याला त्याच बरोबर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा गाजला आहे. या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आणि ऑस्कर मिळवला. जेव्हा आरआरआर चित्रपटामधील नाटु नाटु गाण्याला ऑस्करही मिळाला तेव्हा या सगळ्यामध्ये आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली आणि त्या चित्रपटातील रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर चर्चेत आले होते.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ अव्हेंजरमध्ये थॉरच्या भूमिकेत होता. या अभिनेत्याची जगभर प्रचंड क्रेझ आहे आणि खासकरून भारतामध्ये तर फार जास्तच. ख्रिस हेम्सवर्थचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. काही वर्षांपूर्वीच त्याचा एक चित्रपट आला होता तेव्हा नेटफ्लि्क्सवर आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या महिन्यात त्याच्या एक्स्ट्रॅक्शन नावाच्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ख्रिस हेम्सवर्थने सांगितले आहे की तो आता आपल्याला बॉलीवूडच्या चित्रपटांची भुरळ पडली आहे. याचदरम्यान त्याला राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने विशेष प्रभावित केले आहे.

अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ पुढे म्हणाला की, त्याला चित्रपटातील दोन मुख्य कलाकार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे. त्यानं एका कार्यक्रमामध्ये त्याविषयी बोलून दाखवले आहे. ख्रिसचा एक्स्ट्रॅक्शन नावाच्या चित्रपटामध्ये दुसरा भाग १६ तारखेला प्रदर्शित होणार आहे. मागील तीन वर्षांपासून ख्रिसचा एक्स्ट्रॅक्शन नावाच्या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा रणदीप हुडाही दिसला होता. सॅम हारग्रेव्ह नावाच्या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग जूनच्या १६ तारखेला प्रदर्शित होतो आहे. चाहते गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहत होते. ख्रिसनं राजामौली यांना फोन करुन त्यांचे कौतूकही केले.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version