घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा एकदा पडला प्रेमात! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

प्रसिद्ध रॅपर, संगीतकार आणि संगीत निर्माता यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) हा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे.

घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा एकदा पडला प्रेमात! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

प्रसिद्ध रॅपर, संगीतकार आणि संगीत निर्माता यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) हा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याच नवीन गाणं ही चांगलच गाजत असतांना त्याची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच हनी सिंगचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हनी सिंग पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता तो मॉडेल टीना थडानीला डेट करत आहे. गर्लफ्रेंडचा हात पडकडून चालणाऱ्या हनी सिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

घटस्फोटानंतर त्याचं नाव टीना थडानीसोबत जोडलं गेलं. मात्र त्यावेळी दोघांनीही याबाबत काही पुष्टी केली नव्हती. मात्र आता एक व्हिडिओसमोर आलाय त्यात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. हनी सिंगने यापूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो एका मुलीचा हात धरताना दिसत होता. फोटोत मुलीचा चेहरा दिसत नसला तरी फोटो पाहून असे वाटले की हनी सिंग कुणाला तरी डेट करत आहे.

सोशल मीडियावर हनी सिंग आणि टीना थडानी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “नव्या गर्लफ्रेंडसाठी शुभेच्छा मी तुझ्यासाठी खूप खुश आहे.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “तुझी बायको खरंच बोलत होती की तुझी गर्लफ्रेंड आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “नव्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर आणण्यासाठीच तू घटस्फोट घेतला आहे.” याशिवाय अनेकांनी हनी सिंग जुन्या लूकमध्ये परतल्याने चाहते आनंदी असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान हनी सिंगची गर्लफ्रेंड टीना थडानी त्याच्या ‘पॅरिस का ट्रिप’ या गाण्यात दिसली होती. तर हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारपासून २०२२ मध्येच घटस्फोट घेतला होता. शालिनीने हनी सिंगवर अनेक गंभीर आरोप लावले होते. हनी सिंगने आपल्याला मारहाण केली तसेच त्याच्या वागण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम झाल्याचं शालिनीने म्हटलं होतं. याशिवाय त्याने नात्यात विश्वासघात केल्याचा आणि पैशाचा फ्रॉड केल्याचाही आरोप शालिनीने लावला होता. त्यानंतर हनी सिंगने हे सर्व आरोप फेटाळले होते.

हनी सिंगचा २०११ मध्ये पहिला विवाह झाला होता. हनी सिंगने इंडिया रॉकस्टार या रियालिटी शोच्या एका एपिसोडमध्ये आपली पत्नी शालिनीची ओळख लोकांना करून दिली होती. हनी सिंग त्याचे लग्न गुपित ठेवल्याचे दिसून आले होते. कारण बॉलिवूडच्या मेगा प्रोजेक्टमध्ये काम करण्याआधी त्याने लग्न केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

हे ही वाचा : 

IND vs BAN 3rd ODI तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

काँग्रेस नेते नाना पटोलेंची गुजरात निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version