हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाला मी दिवसरात्र मरणाची वाट पहायचो

यावर अनेक चर्चा देखील रंगल्या होता. यादरम्यानच्या काळात त्याच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू होते हे आता हनी सिंह याने सांगितले आहे.

हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाला मी दिवसरात्र मरणाची वाट पहायचो

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग या दिवसात पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच हनी सिंह याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे आता दुसऱ्यांदा हनी सिंह हा प्रेमात पडलाय. काही वर्षांपूर्वी हनी सिंह हा इंडस्ट्रीपासून दूर होता. यावर अनेक चर्चा देखील रंगल्या होता. यादरम्यानच्या काळात त्याच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू होते हे आता हनी सिंह याने सांगितले आहे. आता धुमधडाक्यात हनी सिंह याने पुनरागमन केले आहे. हनी सिंह याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते.

आतापर्यंत हनी सिंह याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हीट गाणे म्हटले आहेत. मात्र, हनी सिंह याच्या आयुष्यामध्ये असा एक काळ आला होता की, दिवस रात्र हनी सिंह त्याच्या मरणासाठी प्रार्थना करायचा. त्याच्या हल्लीच झालेल्या एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. त्याच्या या खुलास्यामुळे चाहते काहीसे आश्चर्यचकित झाले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंगने सांगितले की, तो अनेक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे. पत्नीसोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे खूप दुखावल्याचे त्याने सांगितले. पण काही लोकांनी त्यांना वाईट काळात साथ दिली. आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलताना हनीने सांगितले की तो रोज मृत्यूसाठी प्रार्थना करत असे. मधूनच मूड स्विंग इतके व्हायचे की त्याला स्वतःलाही ते समजत नव्हते. मी वेडा झालो होतो, मी कामात आणि दारूमध्ये इतका मग्न होतो की मी धूम्रपान करायचो. आजार समजायला मला तीन वर्षे लागली. चार वर्षे लढायला लागली.

हे ही वाचा:

वाहन विक्रीच्या बाबतीत ‘या’ कंपनीने हुंडाईला मात देत पटकावला दुसरा क्रमांक

तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version