House of the Dragon : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ सीझनचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस

'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'मध्ये (House of the Dragon) 'गेम ऑफ थ्रोन्स' कथेच्या २०० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सीरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

House of the Dragon : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ सीझनचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस

House of the Dragon

‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’मध्ये (House of the Dragon) ‘गेम ऑफ थ्रोन्स’ कथेच्या २०० वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सीरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चा एकावेळी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या मालिकेतला नऊवा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चे चाहते या सीझनच्या शेवटच्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’च्या आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सीरिजमध्ये व्हिरेसी, त्याने घेतलेले निर्णय आणि त्याच्या कुटुंबाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

व्हिरेसीसह त्याची मुलगी प्रिन्सेस रेनिरा टार्गेरियनच्या आयुष्यावरदेखील ही सीरिज भाष्य करते. सत्तेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमध्ये करण्यात आला आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चा या सीझनचा हा शेवटचा भाग असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. पण हा भाग पाहण्यासाठी उत्सुकदेखील आहेत.

Exit mobile version