हाऊस द ऑफ ड्रॅगन: भारतात GOT चा प्रिक्वेल कुठे पाहायचा?

भारतीय चाहत्यांसाठी प्रीमियर २२ ऑगस्ट रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hostar) वर होईल

हाऊस द ऑफ ड्रॅगन: भारतात GOT चा प्रिक्वेल कुठे पाहायचा?

House of the Dragon

हाऊस ऑफ द ड्रॅगन्स हा गेम ऑफ थ्रोन्स या सिरीजचा अत्यंत अपेक्षित प्रिकवल आहे आणि हा प्रिकवल त्याच्या डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज आहे. सर्व GOTच्या चाहत्यांनी हाऊस ऑफ ड्रॅगन निर्मात्यांनी रिलीज केलेल्या सर्व ट्रेलर्स आणि टीचर्सना पसंती दर्शवली आहे आणि सिरीज स्ट्रीम होण्याची ते आता आतुरतेने वाट पाहत आहेत. जॉर्ज आर आर मार्टिनच्या फायर अँड ब्लड वर आधारित मालिकेने GOT च्या आठवणी पुन्हा जीवंत केल्या आहेत.

हाऊस द ऑफ ड्रॅगन २०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांबद्दल जीओटीसारख्याच पार्श्वभूमी असलेल्या कथेवर आधारित आहे. हाऊस ऑफ द ड्रॅगन वेस्टरोजमधील टार्गेयन्सच्या इतिहासाचे वर्णन करतो, ‘ज्याला डान्स ऑफ द ड्रॅगन’ म्हणतात. शोचे निर्माते आणि कलाकारांनी खूप आधीच GOT पेक्षा हाऊस ऑफ द ड्रॅगन रंजक असण्याचे संकेत दिले आहे.

हाऊस ऑफ द ड्रॅगन २१ ऑगस्ट २०२२ रोजी HBO आणि HBO MAX वर प्रीमियर होईल तथापि भारतीय चाहत्यांसाठी प्रीमियर २२ ऑगस्ट रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hostar) वर होईल.

GOT च्या प्रिकवेलमध्ये दहा भाग असतील. जे दर आठवड्याला रिलीज केले जातील. हाऊस ऑफ द ड्रॅगन चे नवीन भाग २२ ऑगस्ट पासून दर सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ०६:३० वाजता प्रसारित होतील

हाऊस ऑफ द ड्रॅगन : भाग

भाग १ – द हेयर ऑफ ड्रॅगन – २२ ऑगस्ट
भाग २ – द रॉज प्रिन्स – २९ ऑगस्ट
भाग ३ – ५ सप्टेंबर
भाग ४ – १२ सप्टेंबर
भाग ५ – १९ सप्टेंबर
भाग ६ – २६ सप्टेंबर
भाग ७ – ३ऑक्टोबर
भाग ८ – १० ऑक्टोबर
भाग ९ – १७ ऑक्टोबर
भाग १० -२४ ऑक्टोबर

रायन कॉन्डल यांच्यासह एमी विजेते मिंगुएल स्पॉचनिक ज्यांनी GOT च्या द बॅटल ऑफ बस्टर्ड, द विंड्स ऑफ विंटर या भागांचे दिग्दर्शन केले आहे,. यांनी हाऊस द ड्रॅगनसाठी शोरनर म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी या शोच्या पायलट आणि काही अतिरिक्त भागांचे दिग्दर्शन केले आहे. ऑलिव्हिया कूक, स्टीव्ह टोसेंट, इव्ह बेस्ट, फॅबियान फ्रँकेल, सोनोया मिझुनो आणि रीस इफान्स यांनी या मालिकेत विविध भूमिका साकारल्या आहेत.

हे ही वाचा:

अजय पूरकर करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण; जमदग्नीवत्स असं प्रॉडक्शन्स हाऊसच नाव

Exit mobile version