Saara Jamana गाण्यामधील ‘Light Jacket’ कसं बनवलं? Big B Amitabh Bachchan म्हणाले…

सिनेमा हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाला पाहणं खूप जास्त आवडतं. आणि त्यातच बॉलिवूडचे जुने सिनेमे हे अनेकांना आवडत असतात. अमिताभ बच्चन यांचे सिनेमे म्हटलं तर अनेक जण हे सिनेमे आवर्जून बघायला बसतात.

Saara Jamana गाण्यामधील ‘Light Jacket’ कसं बनवलं? Big B Amitabh Bachchan म्हणाले…

सिनेमा हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाला पाहणं खूप जास्त आवडतं. आणि त्यातच बॉलिवूडचे जुने सिनेमे हे अनेकांना आवडत असतात. अमिताभ बच्चन यांचे सिनेमे म्हटलं तर अनेक जण हे सिनेमे आवर्जून बघायला बसतात. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांची चर्चा ही जोरदार चालू असते. अशातच त्यांच्या एका चित्रपटाच्या गाण्यातील जॅकेटची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हे जॅकेट म्हणजे याराना चित्रपटातील सारा जमाना गाण्यातील लाईट जॅकेट.

याराना आणि या चित्रपटातील सारा जमाना हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. अर्थात या गाण्याची अजूनही चांगली चर्चा ही चालू असते. या गाण्यात बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या डान्सची जोरदार चर्चा ही झाली होती पण यापेक्षा जास्त चर्चा झाली होती ती म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या लाईट वाल्या जॅकेटची. हे लाईट वाला जॅकेट पाहिलं की लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात हे जॅकेट परिधान करून डान्स करण्याची प्रेस असते. परंतु हे जॅकेट नेमकं कसं बनवलं गेलं हे तुम्हाला माहित आहे का? तर याबाबतचा एक किस्सा नुकताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोण बनेगा करोडपती 16 च्या मंचावर सांगितला आहे.

१९८१ साली आज इतकी आधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती परंतु त्यावेळेस देखील याराना चित्रपटातील हेच लाईट वाला जॅकेट बनवण्यात आलं तर त्या काळात जॅकेटमध्ये बल्ब लावले होते आणि त्यांना विजेच्या तारेने जोडलं गेलं होतं तर या तारा अमिताभ बच्चन यांच्या पायाच्या ठिकाणी विजेच्या वायर्स होत्या. विजेच्या तारांना सेट वरील मुख्य कनेक्शन शी थेट जोडण्यात आलं होतं. एकंदरीत अशाप्रकारे हे जॅकेट बनवण्यात आलं होतं तसेच याबाबतचा पुढील अनुभव सांगत असताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “या जॅकेटमधील लाईट जशी सुरु झाली तेव्हा मी डान्स करायला लागलो. मला नाचायची इच्छा होती म्हणून मी नाचत नव्हतो तर, मला नाचता नाचता विजेचा शॉक लागत होता. विजेचे हे झटके मला नाचवत होते.” असा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला.कोलकातामधील सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. १९८१ साली आलेल्या ‘याराना’ सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केलं होतं. अमिताभ, अमजद अली, तनुजा, नीतू कपूर या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version