Hrithik Roshan चा ‘Fighter’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलिज

बॉलिवूडचा सर्वात हॅण्डसम (hansome) अभिनेता हृतिक रोशनच्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. हृतिक त्याची गर्लफ्रेंड (girlfriend) सबा अली खानसोबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यातच आता त्याच्या नवीन चित्रपटाचा फर्स्ट लुक (first look) नुकताच समोर आला आहे.

Hrithik Roshan चा ‘Fighter’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलिज

बॉलिवूडचा सर्वात हॅण्डसम (hansome) अभिनेता हृतिक रोशनच्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. हृतिक त्याची गर्लफ्रेंड (girlfriend) सबा अली खानसोबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यातच आता त्याच्या नवीन चित्रपटाचा फर्स्ट लुक (first look) नुकताच समोर आला आहे. हृतिक रोशन हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. हृतिकने कहो ना… प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

आता हृतिकच्या चाहत्यांच्या प्रतिक्षेला फळ मिळत असल्याचे दिसून आले आहे. हृतिकचा ‘फाइटर’ नावाच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक (first look) आजच २७ जून रोजी रिलिज झाला असून प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हृतिक त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘फायटर’ मुळे चर्चेत होताच . त्याच्या तयारीतही तो बराच काळ व्यस्त होता. हृतिक नेहमीच ऍक्शन मुव्हीजमध्ये अधिक दिसून येतो. तर त्याचा आता ‘फाइटर’ हा चित्रपट देखील ऍक्शन थ्रिलर (action thriller) चित्रपट असणार आहे. हृतिकसोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण दिसणार आहे. चाहते या चित्रपटाचा फर्स्ट लुक (first look) पाहून फार खुश आहेत .या लूकसोबतच हृतिकने या चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून या चित्रपटात हृतिक आणि दीपिका शिवाय अनिल कपूरही दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सोमवारी हृतिकने इन्स्टाग्रामवर (instagram) या चित्रपटाचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टसोबत त्यांने पोस्टच्या कॅप्शनमध्ये (caption) लिहिले आहे की, ‘फायटर’ रिलीज होण्यासाठी ७ महिने आहेत आणि हा चित्रपट २५ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हृतिकच्या अनेक चाहत्यांनी त्याचे या चित्रपटासाठी कौतुक केले आहे. तसेच काहींना हा चित्रपट हॉलीवूडची (hollywood) कॉपी वाटत आहे असेही म्हटले आहे. या चित्रपटाचे बजेट २५० कोटी रुपयांचे असून या चित्रपटाची निर्मिती ही यशराज फिल्म्सद्वारे करण्यात आलेली आहे. त्यातच आता हृतिक लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ मध्ये देखील लवकरच दिसणार आहे.

हे ही वाचा:

मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला राम राम प्रवेश शिवसेनेत प्रवेश

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version