विक्रम वेधाच्या ‘अल्कोहोलिया’ गाण्यात हटके अंदाजात थिरकताना दिसणार ह्रितिक

शनिवारी विक्रम वेधाच्या निर्मात्यांनी बहुप्रतीक्षित चित्रपटातील 'अल्कोहोलिया' हे पहिले गाणे रिलीज केले आहे.

विक्रम वेधाच्या ‘अल्कोहोलिया’ गाण्यात हटके अंदाजात थिरकताना दिसणार ह्रितिक

विक्रम वेधा चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांच्या नजरा ह्रितिक रोशनवर आहेत कारण हँडसम हंक ह्रितिक रोशन विक्रम वेधामध्ये त्याच्या ग्रे कॅरेक्टरसह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपटात एका भयानक गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत आहे. राधिका आपटे आणि रोहित सराफ सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जसजसा प्रदर्शित होत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या स्टारला पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. प्रेक्षकांचा हाच उत्साह आणखी वाढवत, शनिवारी विक्रम वेधाच्या निर्मात्यांनी बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ हे पहिले गाणे रिलीज केले आहे.

गाण्यात हृतिक त्याच्या किलर डान्स मूव्हीजसह डान्स फ्लोअरला आग लावताना दिसतो आहे- अल्कोहोलिया या उत्साही डान्स नंबरवर ह्रितिक रोशनने केलेल्या पॉवरपॅक डान्समुळे हे गाणे परिपूर्ण पार्टी गाणे बनते. हातात दारूची बाटली घेऊन या गाण्यात ह्रितिक नाचताना दिसत आहे. बॉलीवूडच्या ग्रीक गॉडने हे गाणे शहरातील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान लॉन्च केले.मनोज मुनताशीर यांनी लिहिलेले आणि विशाल-शेखर, स्निग्धाजित भौमिक आणि अनन्या चक्रवर्ती यांनी गायलेले हे गाणे डान्स नंबर म्हणून सादर केले आहे. गणेश हेगडे यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत विक्रम वेधा या नवीन अॅक्शन चित्रपटातील पहिले गाणे “अल्कोहोलिया” शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात रिलीज करण्यात आले . यावेळी अभिनेत्री राधिका आपटे आणि रोहित सराफ हृतिक आणि सैफ लाँच इव्हेंटमध्ये सामील झाले.

येत्या ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तसेच युरोपमधील २२ देश, आफ्रिकेतील २७ देश, जपान, रशिया, इस्रायल आणि पनामा पेरू सारख्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये म्हणजेच एकूण १०० देशांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित होऊन नवा इतिहास रचणार असल्याची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:

मुलीवर प्रेमाचा वर्षाव करतानाचा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा फोटो होतोय व्हायरल

‘राडा’ सिनेमात पाहायला मिळणार ‘या’ दोन खास कलाकारांची जुगलबंदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version