Hush Hush Webseries Review: सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला जुही चावलाचा डिजिटल डेब्यू

हा खून चौघींपैकी कुणी केला आहे आणि केला तर यामागचे कारण काय आहे?

Hush Hush Webseries Review: सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला जुही चावलाचा डिजिटल डेब्यू

अनेक चित्रपटांच्या माध्यमातून स्त्री पात्रांनी समाजात असणाऱ्या जुन्या आणि क्षुद्र परंपरा मोडीत काढत एक नवी दिशा दाखवली आहे. गेल्या काही चित्रपटांतून महिलांचे नवे रूप पाहायला मिळाले. ज्यामध्ये हे दाखवण्यात आले आहे की, ज्या महिला एकेकाळी घराबाहेर पडण्यास घाबरत होत्या त्या पुरुषापेक्षा कमी नसतात, आता त्या आपल्या हिंमतीच्या जोरावर काहीही साध्य करू शकतात. आजकाल महिला सशक्तीकरण दाखवणाऱ्या अशा चित्रपटांच्या धर्तीवर अनेक वेबसिरीजही बनवल्या जात आहेत, त्यापैकीच एक म्हणजे प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेली ‘हुश हुश’ ही वेबसिरीज आहे, हो, ‘हुश्श हुश्श’ ही एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा सिरीज आहे ज्यामध्ये तुम्ही जुही चावला, कृतिका कामरा, सोहा अली खान, सहाना गोस्वामी, आयेशा झुल्का आणि करिश्मा तन्ना यांसारख्या प्रतिभावान अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहू शकता. या मालिकेचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा आणि शिखा शर्मा यांनी केले आहे.

‘हुश हुश्’ वेबसिरीजची कथा 

या कथेत दाखवण्यात आले आहे की, पोलीस अधिकारी गीता हिला पैसेवाल्या लोकांच्या समाजात एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. एकाच सोसायटीत राहणाऱ्या, एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असलेल्या चार महिलांवर हा खून केल्याचा थेट संशय जातो. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ह्या चौघी भक्कम बंदोबस्त करतात, पण चोखंदळ पोलीस अधिकारी गीता सहजासहजी हार मानत नाही, आता या मालिकेत गीता या चौघांना आपल्या गुंफणाखाली कशी घेते आणि त्यात खरा खुनी कोण आहे हे कसे शोधते हे पाहायला मिळते. तसेच हा खून चौघींपैकी कुणी केला आहे आणि केला तर यामागचे कारण काय आहे?

‘हुश हुश’ वेबसिरीजचे पुनरावलोकन (Review)

ही एक चांगली सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज आहे ज्यामध्ये एक मर्डर मिस्ट्री चतुराईने पडद्यावर सजवण्यात आली आहे, जसजशी कथा पुढे सरकत जाईल तसतसे प्रकरण इतके गुंतागुंतीचे होते की तुम्ही अधिकारी गीता सोबत मालिकेच्या शेवटपर्यंत खऱ्या खुन्याचा शोध घेत राहाल. एकामागून एक येणारे छोटे छोटे ट्विस्ट केसमध्ये तुमची आवड टिकवून ठेवतात, प्रत्येक एपिसोड वेगळ्या स्टाईलमध्ये येतो आणि केस गुंतागुंतीची होत जाते. अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर, जुही चावलाने ईसी नावाच्या पीआर प्रोफेशनलच्या भूमिकेत चांगले पुनरागमन केले आहे, तिने तिचे पात्र शेवटपर्यंत मनोरंजक ठेवले आहे, सोहा अली खाननेही सायबा नावाच्या माजी पत्रकाराच्या भूमिकेत झेंडा रोवला आहे, याशिवाय सहाना गोस्वामी ही झायराच्या भूमिकेत आहे. करिश्मा खन्नाच्या पोलिस अधिकारी गीताच्या भूमिकेत दिसणार आहे. फेम शारीब हाश्मी आणि जयदीप अहलावत यांच्या कॅमिओ रोलही खूप आवडू शकते. मालिकेचे पार्श्वसंगीत जोरदार आहे, बीजीएम हा प्रकार नेहमीच थ्रिलर मालिकेला बसतो. मालिकेचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे तिची संथ गती ज्याच्यामुळे कथा विनाकारण ताणली जातेय.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने टीम इंडियाला केलं ट्रोल

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक, आंदोलनाची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version