spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अशोक सराफ दक्षिणेत असते तर ते आज मुख्यमंत्री असते, राज ठाकरे

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अशोक सराफ यांचं भरभरुन कौतुक (appreciation) आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. आज मोठी माणसं उरली नाहीत म्हणून आमच्यासारख्या माणसांच्या हस्ते तुमचा सत्कार (felicitation) उरकावा लागतोय, हे दुर्दैव असल्याचं यावेळी राज ठाकरे म्हणाले. आज राज ठाकरे हे पुण्य दौऱ्यावर आहेत.

मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये (Marathi and Hindi movies) इतके वर्ष काम करून आपल्या कामाची छाप फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीतर महाराष्ट्र बाहेर सुद्धा अशोक सराफ सोडली आहे. अशोकपर्व कार्यक्रमामध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत की, ”ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो त्याने आपण त्याला आवडतो हे सांगणे आनंद देणारे आहे. समोर कुणीही असो अशोक सराफांना (Ashok Saraf) फरक पडला नाही.” ते म्हणाले, ”आजही अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे नाव घेतल्यानंतर सभागृह तुडुंब भरते. इतकी वर्षे एखादा कलावंत काम करतो. अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री (Chief Minister) राहिले असते. त्यांच्या ४० – ४० फूट कटावेजवर दुग्धभिषेक झाला असता. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत.”

पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ यांचं मूळ घराणं बेळगावचं (Belgaum) आणि त्यांचा जन्म हा मुंबईचा (Mumbai). खरंतर त्यांनीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवला असता. असं म्हणून ठाकरेंनी सभागृहात हशा पिकवला. मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आमच्यासारख्यावर आटोपयला लागत. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते. राज ठाकरे म्हणाले, ”हे लोक आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं. हा दागिना फक्त सराफाच्या घरीच मिळू शकतो.”

हे ही वाचा:

विश्वासात न घेता थेट घोषणा केली, आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

नाराजी नाट्यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss