spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहायला पसंत करता तर, हा चित्रपट आवर्जून पहा

‘शाबाश मिठ्ठू’नंतर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात मोठ्या पडद्यावर परतली आहे.

‘शाबाश मिठ्ठू’नंतर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात मोठ्या पडद्यावर परतली आहे. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दोबारा’ (Dobaara) हा चित्रपट आज सर्वांच्या भेटीस आला आहे. यामध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारा हा चित्रपट स्पॅनिश चित्रपट मिराजचा हिंदी रिमेक आहे. डार्क थीममध्ये बनलेल्या या चित्रपटात तापसीसोबत पावेल गुलाटीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तापसी पन्नू या अभिनेत्रीसह पावेल गुलाटी, नस्सर, राहुल भट्ट, हिमांशी चौधरी, सास्वता चॅटर्जी आणि निधी सिंग असे इतरही अनेक कलाकार आहेत तसेच अनुराग कश्यप हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि एकता कपूर, शोभा कपूर, सुनीर खेतरपाल निर्माते आहेत. आज हा चित्रपट सर्वांच्या भेटीस आला आहे.

दोबारा या चित्रपटाची कथा पुण्यातील १९०० ते २०२० या कालावधीतील दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अनय नावाचा १२ ते १३ वर्षांचा मुलगा आहे. त्याची आई एक वास्तुविशारद आहे, जी चित्रपटाच्या सुरुवातीला एका रुग्णालयाचं इंटेरिअर डिझाइन करत असते. यादरम्यान अनयला त्याच्या शेजारच्या घरात भांडण होत असल्याचं दिसतं. तो प्रथम त्याच्या आईला याबद्दल सांगतो. पण नंतर तो स्वतः शेजारच्या घरी जातो. घरात त्याला एका महिलेचा मृतदेह दिसतो. अनय घाबरून घरी पळतो. घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतानाच अग्निशमन दलाची गाडी त्याला चिरडले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच अनयचा मृत्यू होतो. चित्रपटात प्रत्येक वादळानंतर काही ना काही अनुचित घटना घडते. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या अंतरानंतर तापसीची एण्ट्री होते. चित्रपट आता २०२१ च्या कालावधीकडे सरकतो. तापसी तिच्या टीव्हीवर तेच मूल पाहते, ज्याला अनेक वर्षांपूर्वी अग्निशमन दलाच्या वाहनाने चिरडून ठार केलं होतं. विशेष म्हणजे दोघंही एकमेकांशी टीव्हीवरूनच बोलतात. इतक्या वर्षांनंतर पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती होते. अनय पुन्हा शेजारच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी तापसी त्याला वाचवते आणि इथूनच कथेतला ट्विस्ट सुरू होतो. थरार आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू असतो.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. दोबारा बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की ठराविक शैलीच्या चित्रपटांना प्रेक्षकांसमोर आणावं. प्रेक्षकांना आपल्या विवेकबुद्धीनुसार ती कथा समजून घ्यावी लागेल. चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट बरेच आहेत, पण तुम्ही जर थ्रिलरचे शौकीन असाल तर ‘दोबारा’ चित्रपट नक्की पहा.

 

हे ही वाचा :-

बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांच्या सुटकेसाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरू नका, न्यायधीशांचे स्पष्टीकरण

“दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली” – एकनाथ शिंदे

 

 

Latest Posts

Don't Miss