‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (९ सप्टेंबर) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

Brahmastra

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (९ सप्टेंबर) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आलिया – रणबीर हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. बॉयकॉट बॉलीवूड असा ट्रेंड जोरदारपणे सुरु असताना दुसरीकडे रणबीरच्या ब्रम्हास्त्रचे (Ranbir kapoor) काय होणार असा प्रश्न निर्माते आणि दिग्दर्शकांना पडला आहे. एकीकडे बॉलीवूडमधल्या भल्या भल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रेक्षकांनी धडा (Alia Bhatt) शिकवल्यानं रणबीरच्या ब्रम्हास्त्रवर सगळ्यांची नजर असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे मुंबईमध्ये या चित्रपटाचं नुकतच स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला रणबीर आणि आलिया यांनी हजेरी लावली. ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याचे वडील देब मुखर्जी यांच्यासोबत स्क्रिनिंगमध्ये दिसला होता. आलियाची बहिण शाहीन भट्ट ही देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होती. स्क्रिनिंग दरम्यानचे आलिया आणि रणबीरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी आलिया आणि रणबीरचं कौतुक देखील केले आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सध्या बॉयकॉटचा (Boycott) ट्रेंडच सुरू आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. तर दुसरीकडे ट्विटरवर #BoycottAliaBhatt आणि #BoycottBrahmastra असा ट्रेंड सुरू झाला.

अशी अनेक करणे समोर येत आहे त्यामुळे हा ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ गाजणार कि आपटणार याकडे अनेकांचे लक्ष हे लागलेले आहे.

४१० कोटींचे बजेट असणारा ब्रम्हास्त्र हा २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करेल असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यातील व्हिएफएक्स हे कमालीचे लक्षवेधी असून पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये अशाप्रकारचे व्हिएफएक्स वापरण्यात आल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वादही रंगलेला आहे. त्यावरुन दिग्गज सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रेक्षकांना जे आवडते त्यावर ते कौतूकाचा वर्षाव करतात त्यामुळे टॉलीवूडनं बॉलीवूडला धक्का दिला असे म्हणणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. ९ सप्टेंबरला ब्रम्हास्त्र प्रदर्शित होणार आहे. त्याचे प्रमोशनही जोरदारपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. दोनशे कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. त्याच्या गेल्या काही चित्रपटांचा आढावा घेता ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे.

हे ही वाचा:

ब्लॉकबस्टर ‘चंद्रमुखी’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; चंद्राच्या अदांनी प्रेक्षक पुन्हा होणार घायाळ

लालबागच्या राजासाठी केले खास उकडीचे मोदक, अभिनेत्री ऋतुजाचा व्हिडिओ व्हायरल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version