OTT च्या माध्यमातून भारतीय सिरीज जागतिक मंचावर : अभिषेक बच्चन

OTT  च्या माध्यमातून  भारतीय सिरीज जागतिक  मंचावर : अभिषेक बच्चन

अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ब्रीद: इनटू द शॅडोज या सिरीज मार्फत ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले होते , ही एक अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसाठी अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित भारतीय गुन्हेगारी नाटक थ्रिलर स्ट्रीमिंग टेलिव्हिजन मालिका आहे जी मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केली आणि . या मालिकेत अभिषेक बच्चन हे प्रमुख भूमिकेत होते . अभिषेक बच्चन या संधर्भात एका कार्यक्रमात म्हणाले की आकर्षक थ्रिलर सादर करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.”थ्रिलर सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत काम कारण अतिशय कठीण आहे. कारणअभिषेकने याआधी कोणतीही थ्रिलर सिरीजमध्ये किभा चित्रपटात काम केले नव्हते.ब्रीद या सिरीजमधिल अभिषेकला मिळालेलय भूमिकेने त्यांना या सिरीजकडे आकर्षित केले. अभिषेक यांना सिरीज मधील कहाणी आवडली असे अभिषेक बच्चन यांनी सांगितले .

अभिषेक बच्चन यांनी वाटत की ‘जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले, तेव्हापासून आपण एक बटण दाबल्यानंतर काहीही पाहू शकतो . ओटीटीवर आपण प्रत्येक भाषेत शो पाहू शकतो . चित्रपट अथवा सिरीज कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले तरी कंटेंट चांगला असेल तर सगळीकडून त्याच स्वागत होत . डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे कलेक्शन ऐवजी कंटेंटकडे लक्ष देतात. काही लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना कंटेंटपेक्षा कलेक्शन आणि पैशांबाबत जास्त विचार करतात .असं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अभिषेकनं सांगितलं. तर अभिषेक बच्चन यांचा आसा विश्वास अहे की या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने भारतीय कथा जागतिक मंचावर चमकवण्याची एक योग्य व्यासपीठ बनवले आहे .

अभिषेक बच्चन यांनी पुढे सांगितले की, भारतीय कथांना आता अधिक मान्यता मिळत आहे आणि माध्यम कोणतेही असो, चांगल्या कलेचे नेहमीच कौतुक केले जाईल. आणखी एक प्लस पॉइंट आहे आणि अभिषेकला हे पाहून चांगले वाटते की डिजिटल प्लॅटफॉर्म फक्त आकड्यांची चिंता करत नाहीत आणि ते वास्तविक गोष्टींवरअधिक लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान, अभिषेकच्या आगामी वेब सीरिजचा को-स्टार नवीन कस्तुरिया आहे. अभिषेकाचे कौतुक केले जाते. अभिनेता नवीनला वाटते की अभिषेकचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणि पडद्याबाहेरही वेगळे आहे. पहिल्या दिवशी तो अभिषेकला शूटिंगदरम्यान भेटला, तो ते कसे सुरळीतपणे पार पडेल याबद्दल तो खूप घाबरला होता कारण ऑफ कॅमेरा अभिषेक खूप सरळ आहे परंतु ज्या क्षणी तो शॉट देण्यास तयार आहे, आणि ते अभिनयपूर्ण करतो. एक प्रकारे वेगळे व्यक्तिमत्व बनते.

अभिषेक बच्चन पुढे ‘घूमर’ चित्रपटामध्ये मध्ये सैयामी खेर सोबत दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, तर सैयामी महिला क्रिकेटरच्या भूमिकेत आहे. ‘घूमर’ हा देखील आर बाल्कीचा २००९ च्या हिट ‘पा’ नंतर अभिषेक बच्चनसोबतचा दुसरा सहयोग आहे.

हे ही वाचा :

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री प्रकरणात मोठी घडामोड; अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकर आज संपूर्ण आठवड्यातील स्पर्धकांची अक्कड उतरवणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version