शीना बोरा हत्याकांडवर आधारित कथा मांडणारी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शीना बोरा हत्याकांड म्हणजे त्यावेळी संपुर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना आहे.ही जेव्हा घटना समझली तेव्हा संपुर्ण देशाला धक्का बसला,

शीना बोरा हत्याकांडवर आधारित कथा मांडणारी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शीना बोरा हत्याकांड म्हणजे त्यावेळी संपुर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना आहे.ही जेव्हा घटना समझली तेव्हा संपुर्ण देशाला धक्का बसला,अनेकांना या घटनेनं कोड्यात पाडलं होतं.त्या घटनेचा तपास करणाऱ्या अनेक तपास यंत्रणांनाही देखील त्या केसेची तपासणी करताना अनेक वेगळे प्रश्न पडले होते.दरम्यान आता शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्रानी मुखर्जीवर आधारित एका माहितीपटाच्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.ही घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये या सिरीजबाबतची आतुरता वाढवली आहे.

द इंद्रानी मुखर्जी स्टोरी – बरीड ट्रुथ असे त्या मालिकेचे नाव असून ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी नेटफ्लिक्सकडून त्या डॉक्युसीरिजची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी  महिन्याच्या २३ तारखेला ही वेब सिरीज प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्रानी मुखर्जी ही शीना बोरा हत्याकांडातील काही गोष्टींवर सडेतोडपणे भाष्य करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर जे पोस्टर व्हायरल झाले आहे त्यात इंद्रानीचा चेहरा दिसतो आहे. २०१२ मध्ये घडलेल्या त्या हत्याकांडानं मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर इंद्राणी ही २०१५ मध्ये चर्चेत आली होती.इंद्राणीने शीनाबाबतच्या अनेक गोष्टींचा त्यावेळी खुलासा केला.त्यानंतर पुढे बरीच वर्षे तिला तुरुंगात घालवावी लागली. आता या सगळ्या घटनेवर तिनं पुस्तकही लिहिलं आहे.त्या पुस्तकात शीना बोराच्या हत्याकांडावरील भाष्य तिने केले आहे.

इंद्रानी मुखर्जीचे नाव शीना बोरा केसमधील प्रमुख आरोपी म्हणुन समोर आलं होतं. आता नेटफ्लिक्सनं त्यांच्या इंस्टावरुन आगामी डॉक्युसीरिजची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, साऱ्या देशाला धक्का देणारी ती घटना होती. एका कुटूंबाचे डार्क सिक्रेट या सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. ही सिरीज २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ही डॉक्युसीरिज इंद्राणी मुखर्जीच्या २०२३ मध्ये आलेल्या अनब्रोकन – द अनटोल्ड स्टोरी नावाच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्राणीनं या घटनेत सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.इंद्राणीनं काही महिन्यांपूर्वी एक वेगळाच दावा केला होता.त्यात तिनं म्हटलं होतं की, ज्या मुलीच्या हत्येसाठी मला तुरुंगात डांबण्यात आले ती अजुनही जिवंत आहे.त्यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. तिनं याबाबत तिच्या आत्मकथनात्मक पुस्तकामध्ये खुलासाही केला असल्याचे म्हटले आहे.दरम्यान आता प्रेक्षकांना हे गौढ सत्य जाणुन घेण्याची उस्तुकत्ता लागली आहे.नक्की शीना बोरा प्रकरण कुठून चालू झाले आणि त्याचा शेवट काय आहे हे प्रेक्षकांना जाणुन घ्यायचे आहे.

हे ही वाचा:

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना खुश करण्यावर सरकारचा भर

‘एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील’….किरण मानेनी पोस्ट शेअर करत पुष्करला खडेबोल सुनवलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version