अजूनही काश्मीरी पंडितांवर अन्याय सुरूच, लवकरच पडद्यावर दिसणारा :’द कश्मीर फाइल्स 2′

अजूनही काश्मीरी पंडितांवर अन्याय सुरूच, लवकरच पडद्यावर दिसणारा :’द कश्मीर फाइल्स 2′

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट होता ,हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ब्लॉगबस्टर धमाका करत 340 कोटींची कमाई केली .

काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटाने सर्वांनाच हादरवून सोडले आणि तेव्हापासून या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार असा प्रश्नही विचारला जात आहे.

काल सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने काश्मीरी पंडितांवर अत्याचार होतानाचा एक व्हिडीओ शेअर केला . व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले आहे की “खोऱ्यात सतत काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत, पण स्वतःला हिंदूंचे ठेकेदार म्हणवणारे सरकार झोपी गेले आहे का?सततच्या हत्या, अत्याचाराला तो जुमानत नव्हता. गोष्टी खूप वाईट आहेत. काश्मिरी पंडित ९० च्या दशकातील संकटातून जात आहेत “याचा सरकारला काही फरक पडत नाही का? या ट्वीटला रीट्वीट करत श्रेयांश त्रिपाठीने विवेक अग्निहोत्रीला टॅग करत विचारलं आहे,” या घटनेवर विवेक अग्निहोत्री कश्मीर फाइल बनवू शकतो का?

श्रेयांश त्रिपाठीने विचारलेल्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रीने उत्तर दिलं “काम सुरू आहे. 2023 पर्यंत वाट पाहा”. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’चा दुसरा भाग 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्या आणि अमानुष अत्याचारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

 हे ही वाचा:

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

Swapnil Joshi Birthday : स्वप्नीलने बालपणीच केलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण… घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version