पुन्हा पडद्यावर दिसणार इरफान खान, इरफानचा नवीन लवकर होणार प्रदर्शित

स्कॉर्पियन्स सिनेमाचे गाणे २०१७ मध्ये रिलीज झाले आहेत आणि या चित्रपटाची बरीच प्रशंसा करण्यात आली होती. परंतु हा चित्रपट स्विस-फ्रेंच-सिंगापूर आणि राजस्थानी भाषांमध्ये बनवण्यात आल्याने अभिनेत्यांच्या चाहत्यांसाठी तो हिंदी भाषेत पुन्हा प्रदर्शित होत आहे.

पुन्हा पडद्यावर दिसणार इरफान खान, इरफानचा नवीन लवकर होणार प्रदर्शित

स्कॉर्पियन्स सिनेमाचे गाणे २०१७ मध्ये रिलीज झाले आहेत आणि या चित्रपटाची बरीच प्रशंसा करण्यात आली होती. परंतु हा चित्रपट स्विस-फ्रेंच-सिंगापूर आणि राजस्थानी भाषांमध्ये बनवण्यात आल्याने अभिनेत्यांच्या चाहत्यांसाठी तो हिंदी भाषेत पुन्हा प्रदर्शित होत आहे. इरफानसोबत या चित्रपटात गोलशिफ्तेह फराहानी, वहिदा रहमान आणि शशांक अरोरा हे देखील मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. आज इरफान खान या जगामध्ये नसला तरी आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. या चित्रपटाने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक आठवणी चाहत्यांच्या हृदयामध्ये सोडल्या आहेत.

इरफान खान ला मिस करणारे चाहते आता खुश असतील, कारण त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अभिनेत्यांच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ रिलीज होणार आहे. इरफानने बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यत त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. आजही प्रेक्षकांनी इरफानचे चित्रपट टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला त्याच्या चाहत्यांना आवडते. इरफानचे २९ एप्रिल २०२० रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्याचा शेवटचा चित्रपट ‘इंग्लिश मीडियम’ असे म्हटले जात असले तरी त्याचा एक चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. इरफान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ हा दिवंगत अभिनेत्याच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असेल.

इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मंगळवारी त्याच्या वडिलांच्या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. पोस्टरमध्ये इरफान आणि गोलशिफ्तेह फराहानी दिसत आहेत.२८ एप्रिलला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रदर्शित होणार आहे. इरफान खानच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. इरफानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांनी कमेंट्स मध्ये त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. या चित्रपटाची कथाही खूप रंजक असणार आहे.

हे ही वाचा : 

सहा वर्षात उत्तर प्रदेशमध्ये झालेत १०,७१५ एन्काऊंटर, योगींच्या कार्यशैलीने उत्तर प्रदेश ठरतोय उत्तम प्रदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी

अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version