spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Song Joong-Ki करतोय एका ब्रिटिश मुलीला डेट? Reborn Rich ऍक्टरचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्याच्या एजन्सीनेही तो रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली आहे परंतु तो डेट करत असलेल्या महिलेची ओळख त्यांनी उघड केलेली नाही.

केड्रामा स्टार सॉन्ग जुंग-की (Song Joong-Ki ) एका ब्रिटीश महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे आणि इंटरनेटवर व्हायरल झालेले फोटोस आणि व्हिडिओ पाहता नेटकऱ्यांना हि महिला ब्रिटिश अभिनेत्री कॅटी लुईस सॉन्डर्स (Katy Louise Saunders) आहे असे वाटत आहे. आधी त्याच्या सॉन्ग जुंग-कीने (Song Joong-Ki ) डिसेंडंट्स ऑफ द सनमधील(Descendants of the Sun) त्याची सह-कलाकार सॉन्ग हाय-क्योशी (Song Hye-Kyo) लग्न केले होते. पण, त्यांच्यातल्या मतभेदांमुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. आता घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर तो पुन्हा डेट करत आहे. अभिनेत्याच्या एजन्सीनेही तो रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली आहे परंतु तो डेट करत असलेल्या महिलेची ओळख त्यांनी उघड केलेली नाही. एजन्सीने चाहत्यांना त्याचे नाते सकारात्मक दृष्टीने पाहण्याची विनंती केली.

सॉन्ग जोंग-कीच्या (Song Joong-Ki) एजन्सीने सांगितले की, “अभिनेता सॉन्ग जोंग की (Song Joong-Ki) सध्या सकारात्मक भावना असलेल्या एका महिलेला डेट करत आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही त्यांच्या नातेसंबंधाकडे प्रेमळपणे पहाल. या वस्तुस्थितीकडे तुम्ही समजूतदारपणे पहावे. आम्ही सध्यातरी कोणत्याही माहितीची पुष्टी करू शकत नाही. ते एकमेकांना डेट करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि आपण कोणतेही अफवा पसरवणारे किंवा पुष्टी नसलेले अहवाल प्रकाशित न केल्यास आम्ही आभारी राहू.”

सॉन्ग जोंग-कीची (Song Joong-Ki) गर्लफ्रेंड सेलिब्रिटी नाही असे म्हटले जात असले तरी, अपन स्टार अवॉर्ड्समध्ये डेसांग (Daesang at Apan Star Awards) स्वीकारताना त्याने अलीकडील भाषणात कॅटीला (Katy Louise Saunders) डेट करत असल्याचे संकेत दिले. भाषणादरम्यान अभिनेत्याने कॅटी, नार्ला, माया, अँटेस यांचे आभार मानले. कॅटीच्या (Katy Louise Saunders) आधीच्या पोस्टपैकी एक पाहता, तिच्या कुत्र्यांची नावे माया आणि अँटेस आहेत.

२०२१ मध्ये अभिनेत्याने कॅटीला एका म्युच्युअल मित्राद्वारे भेटल्याचा दावाही अहवालात केला आहे. कॅटीने त्याच्यासोबत ‘रिबॉर्न रिच’ च्या (Reborn Rich) परदेशातील प्रमोशनसह विविध कार्यक्रमांनाही साथ दिली. सॉन्ग जोंग-कीचा शो (Song Joong-Ki) रिबॉर्न रिचचे (Reborn Rich) सर्व भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या डेटिंगच्या बातम्यांना त्याच्या एजन्सीने पुष्टी दिली. रिबॉर्न रिचने (Reborn Rich) २०२२ मध्ये २६.९% सह मिनी-सिरीजसाठी सर्वाधिक दर्शक रेटिंग मिळवले.

हे ही वाचा:

दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही Rahul Gandhi दिसले हाफ टी-शर्टमध्ये, व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

ICICI बँक कर्ज प्रकरणात, वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss