एकदा अपयशी ठरल्यानंतर दुसरी संधी मिळणं अवघड, बॉडी शेमिंगबद्दल शिल्पा शिरोडकरने केला खुलासा

आजच्या घडीला जर मी चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करायचं ठरवलं तर मला काम मिळणार नाही. ९० च्या दशकातच मला जाडी असल्याने अनेकदा नाकारलं गेलं होतं. त्यामुळे सध्या तो विचार न केलेलाच बरा. फराह खानने देखील मला ‘छैया छैया’ गाण्यासाठी विचारलं होतं, पण नंतर मी खूप जाड आहे म्हणून माझ्याऐवजी मलायकाला घेतलं गेलं.

एकदा अपयशी ठरल्यानंतर दुसरी संधी मिळणं अवघड, बॉडी शेमिंगबद्दल शिल्पा शिरोडकरने केला खुलासा

सध्याच्या काळात बॉडी शेमिंग (Body shaming) हा प्रकार फारच प्रचलित झाला आहे. अशी अनेक मुलं -मुली आहेत जे बॉडी शेमिंगमुले त्रस्त (afflicted) आहेत. तसेच बॉलीवूड (Bollywood) मध्ये देखील अशा अनेक अभिनेत्री (actress) आहेत ज्या बॉडी शेमिंगमुळे त्रस्त आहेत. त्यातमधीलच एक म्हणजे शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar). शिल्पाने ९० च्या दशकात (In the 90s) ‘खुदा गवाह’ (khuda gavah), ‘गज गामिनी’(Gaja Gamini), ‘आंखें’ (ankhe), ‘मृत्युदंड’ (mrutyudand) सारख्या चित्रपटा (movie) तून प्रेक्षकांवर (audience) आपली छाप (impression) पडली होती. पण शिल्पा सध्या चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. त्याच कारण म्हणजे बॉलीवूड मध्ये केलं जाणार बॉडी शेमिंग. वजनाने जाड असल्यामुळे काम मिळत नसल्याचा खुलासा शिल्पाने एका मुलाखतीत केला. यामध्ये तिने चित्रपटसृष्टीत तिला मिळालेली वागणूक आणि तिचा अनुभव याविषयी आपलं मत व्यक्त केलं होत.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये शिल्पाने यावर भाष्य केलं आहे. शिल्पाला शारीरिक ठेवणीवरून बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा टोमणे (taunt) ऐकावे लागले होते, असा खुलासा (Disclosure) तिने यावेळी केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (Times of India) ला दिलेल्या मुलाखती (interview) मध्ये शिल्पाने म्हटलं होत,“आजच्या घडीला जर मी चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करायचं ठरवलं तर मला काम मिळणार नाही. ९० च्या दशकातच मला जाडी असल्याने अनेकदा नाकारलं गेलं होतं. त्यामुळे सध्या तो विचार न केलेलाच बरा. फराह खानने देखील मला ‘छैया छैया’ गाण्यासाठी विचारलं होतं, पण नंतर मी खूप जाड आहे म्हणून माझ्याऐवजी मलायकाला घेतलं गेलं.”

चित्रपटसृष्टीमध्ये झालेले बदल आणि नव्या कलाकारांना कराव्या लागणाऱ्या स्ट्रगलबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली,“आमच्या वेळी आम्हाला प्रत्येक चित्रपटातून नवीन काहीतरी शिकायला मिळायचं. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सगळे एकमेकांसोबत मिळून मिसळून काम करायचे. पण सध्या या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली आहे, त्यामुळे सध्याच्या तरुणांना या क्षेत्रात एकदा अपयशी ठरल्यावर दुसरी संधी मिळणं जरा कठीणच आहे”, असं शिल्पाने या वेळी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘या’ देशामध्ये संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून हजारो नागरिकांनी केली तोडफोड

महाविकास आघाडीतील नेत्यांचा मेंदू गुडघ्यात,मनसेचा हल्लाबोल

Bigg Boss Marathi 4 चा महाअंतिम सोहळा दणक्यात पडला पार, ‘या’ अभिनेत्याचा झाला विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version