सैफ आणि अमृतासाठी हा निर्णय घेणे खूप कठीण होते – शर्मिला टागोर

सैफ आणि अमृतासाठी हा निर्णय घेणे खूप कठीण होते – शर्मिला टागोर

दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे ८ वे पर्व सध्या सुरु असून प्रत्येक एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेयर करण्यात आला. ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमात अनेक स्टार्स हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाचा एक भाग प्रदर्शित करण्यात आला ज्यामध्ये सैफ अली खान  (Saif Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी उपस्थिती दर्शवली होती.  ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या मंचावर सैफ अली खान आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या आई आणि मुलाच्या जोडीने त्यांच्या आयुष्यातील किस्से सर्वांसमोर मांडले.

शर्मिला टागोर यांनी या कार्यक्रमात मुलगा सैफ अली खान आणि अमृता सिंघ (Amrita Singh) यांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केले. शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी सांगितले की, सैफ अली खान  (Saif Ali Khan) आणि अमृता सिंघ वेगळे झाले, ही गोष्ट कुटुंबासाठी अत्यंत त्रासदायक होती. सैफ आणि अमृताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनतर तो सर्वात आधी मला सांगितला होता. त्यावेळी मी त्यांना सहकार्य देऊन त्यांना पाठींबा देण्याचे ठरवले होते. सैफ आणि अमृता या दोघांसाठी हा निर्णय घेणे खूप कठीण होते. त्यावेळी मी शांत राहण्याचे पसंत केले होते.

‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या ८ व्या पर्वात सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत करीना (Kareena), सोहा (Soha) आणि सारा अली खानचा (Sara Ali Khan) एक व्हिडीओ दाखवण्यात आला. सारा अली खान ही शर्मिला टागोर म्हणजेच तिच्या आजीला लाडाने ‘बडी अम्मा’ अशी हाक मारते. तर सून करीना कपूर तिच्या सासूबाई अर्थात शर्मिला टागोर यांना ‘अम्मा’ असा वाज देते. यासोबतच, करीना तिच्या नवऱ्याला म्हणजेच, सैफ अली खानला ‘सैफू’ असं म्हणते.

हे ही वाचा:

देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, काळजी घेण्याचे आवाहन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमला मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version