Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

सुशांत सिंग राजपूतचे वडिल कृष्ण कुमार सिंग हे केके सिंग या नावाने ओळखले जातात. सुशांत सिंगचे वडील पाटण्यात सरकारी नोकरी करत होते परंतु आता ते आता निवृत्त झाले आहेत.

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

तीन वर्षांपूर्वी आजच्याच (१४ जून) दिवशी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याचे निधन झाले होते. सुशांत सिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु ही आत्महत्या नसून हत्त्या असल्याचा दावा सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता. आजही सुशांतचे कुटुंबीय आणि लाखो चाहते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज सुशांत सिंगला जाऊन तीन वर्ष झाली परंतु आज ही सुशांतचे वडील त्याच्या आठवणीत व्याकुळ होतात. तर बहिणींना सुशांतच्या जाण्याचे दुःख सहन होत नाही.

सुशांत सिंग राजपूतचे वडिल कृष्ण कुमार सिंग हे केके सिंग या नावाने ओळखले जातात. सुशांत सिंगचे वडील पाटण्यात सरकारी नोकरी करत होते परंतु आता ते आता निवृत्त झाले आहेत. केके सिंह यांचा सुशांतच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमधला एक फोटो व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने, कुटुंबाने त्यांची वेळीच काळजी घेतली, सध्या ते बरे आहेत आणि आपल्या मुलींसोबत राहत आहे. परंतु आज देखील सुशांतचे वडील हे आपल्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ असतात.

सुशांत सिंगच्या चारही बहिणी या आपल्या भावाच्या दुःखात आज ही व्याकुळ होतात. सुशांतची मोठी बहीण मितू सिंग ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे आणि मधली बहीण प्रियांका सिंग व्यवसायाने वकील आहे, तर धाकटी नीतू सिंग आणि सर्वात धाकटी श्वेता सिंग कीर्ती या दोघीही व्यवसाय करतात. श्वेता ही सध्या अमेरिकेत वास्तव्यात आहे.

आज १४ जून २०२३ रोजी सुशांत सिंग राजपूतच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सुशांतच्या सर्वात धाकट्या बहिणीने म्हणजेच श्वेताने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला तिने “लव्ह यू भाई, आणि सलाम तुमच्या बुद्धिमत्तेला. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. पण मला माहित आहे की तू आता माझा एक भाग आहेस…. तू माझ्या श्वासासारखा अविभाज्य झाला आहेस” असे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने सुशांत आणि मुलांसोबतचा एक फोटो सोशलमीडिया वर पोस्ट केला आहे. दरम्यान, सुशांतच्या बहिणी आणि सुशांतचे वडील अजूनही सीबीआय तपासाच्या अहवालाची वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

Raj Thackeray यांनी केली कार्यकर्त्यांना विनंती

ऍड वॉरमध्ये यु टर्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version