spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जॅकलीन फर्नांडिसने केला आरोप, सुकेश चंद्रशेखर माझ्या भावनांशी खेळला

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Actress Jacqueline Fernandez) बुधवारी दिल्लीतील कोर्टात २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचा (Sukesh Chandrasekhar) समावेश असल्याचे सांगितले की, त्याने तिच्या भावनांशी खेळून तिचे आयुष्य “नरक” बनवले आहे. सुकेशसह जॅकलिनच्याही समस्या वाढल्या असून तिने याप्रकरणी जबाब दिला आहे. या जबाबामुळे तिला पुन्हा एका कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.

जॅकलीनच्या विधानानुसार, त्यांनी सन टीव्हीचे (Sun TV) मालक म्हणून स्वतःची ओळख करून दिली होती आणि दावा केला होता (तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री) जे. जयललिता (J. Jayalalithaa) त्यांच्या आत्या होत्या.”चंद्रशेखर म्हणाले की तो खूप मोठा चाहता आहे, आणि म्हणाला की मी दक्षिण भारतातही चित्रपट करावेत आणि सन टीव्हीचे मालक म्हणून त्यांच्याकडे अनेक प्रकल्प आहेत. आपण दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जॅकलिनने सांगितलं, की पिंकी ईरानीला (Pinky Irani) चंद्रशेखरबाबत संपूर्ण माहिती होती. पण तिनेही कधी याबाबत मला सांगितलं नाही. जॅकलिनने कोर्टाकडे कामासाठी दुबईला जाण्याची परवानगी मागितली होती. तिच्या अर्जावर ईडीला नोटिस बजावण्यात आली होती. यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होईल. मागील वर्षीही जॅकलिनने तिच्या आजारी आईला भेटवण्यासाठी बहरीनला जाण्याची विनंती केली होती. मात्र तिला यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीने केला अमृता फडणवीसांवर आरोप, सरकारी बंगल्यात बनवला रील…

पप्पू म्हणणं दुर्देवी, आरबीआयचे माजी गव्हर्नरकडून राहुल गांधी यांची स्तुती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss