‘जय भवानी जय शिवराय’ म्हणत ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला

“गणेशोत्सवाची गणेशभक्तांना शिवशक्तीमय भेट…सादर आहे शिवप्रताप गरुडझेप या आगामी चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ गाणे!”

‘जय भवानी जय शिवराय’ म्हणत ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आणि झालेल्या ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती दर्शवली आहे. त्यात शिवाजी महाराज आणि त्यांची कारकीर्द दर्शवणारे, त्याचे चित्रण करणाऱ्या सिनेमांचे प्रमाण बरेच वाढले आहे. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ प्रदर्शित झालेले या चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. प्रेक्षकांच्या मिळालेल्या या उत्तम प्रतिसादानंतर या चित्रपटातील आणखीन एक गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘जय भवानी जय शिवराय’ असे या गाण्याचे नाव आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. या गाण्यामध्ये अमोल कोल्हे यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाचे काही बिहाइंड द सीन्सही पाहायला मिळत आहेत.“गणेशोत्सवाची गणेशभक्तांना शिवशक्तीमय भेट…सादर आहे शिवप्रताप गरुडझेप या आगामी चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ गाणे!” सं अमोल कोल्हे यांनी गाणं शेअर करताना म्हटलं आहे. या गाण्याचे बोल हृषिकेश परांजपे यांनी लिहिले असून गायक आदर्श शिंदेच्या ठसकेबाज आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. शशांक पोवार यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे.

जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे ही वाचा:

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

घरबसल्या इथे पहा लालबागच्या राजाची पहिली झलक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version