जान्हवी कपूरच्या गुड लक जेरी चा ट्रेलर प्रदर्शित

'गुड लक जेरी' ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) वर 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

जान्हवी कपूरच्या गुड लक जेरी चा ट्रेलर प्रदर्शित

गुड लक जेरी | जान्हवी कपूर

मुंबई : जान्हवी कपूरच्या (Janhavi Kapoor) आगामी चित्रपट गुड लक जेरीचा टीझर आज गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित आणि आनंद एल राय निर्मित ब्लॅक कॉमेडी क्राइम असलेला हा चित्रपट 29 जुलै रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूर 34 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये व्हिलन समोर उभी असलेली दिसत आहे, आणि ते व्हीलन तिच्यावर ओरडुन राग व्यक्त करताना दिसत आहेत. Good Luck Jerry Teaser out

टीझर मध्ये सुशांत सिंग, सिद्धार्थ सेन, पंकज मट्टा, तसेच चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे इतर कलाकार दिसतायत. टीझर च्या सुरुवातीला सुशांत सिंह जान्हवी वर बंदूक उगारत म्हणतो, ”अरे हे काय आहे?” हे पोस्टर का लीक केलं असा प्रश्न विचारतात. नंतर तिथे बसलेले प्रत्येक जण भांडायला सुरवात करतात. नंतर जान्हवी ओरडून सगळ्यांना शांत करते आणि म्हणते आता फक्त फक्त पोस्टर आलयं आणि ट्रेलर लवकरच येईल. असं सांगते अशा पद्धतीचा 30 सेकंदाचा गुड लक जेरी सिनेमाचा टिझर आहे.

 

हेही वाचा :

VIRAL VIDEO : भर रस्त्यावर तरूणांचा नागिन डान्स

सिनेमाचे कथानक असामान्य मुलीच्या भूमिके भोवती फिरताना दिसेल. जिला आयुष्य कसे उत्तम जगायचे हे ठाऊक असते. कठीण प्रसंगात ती कशी खुश असते. हे हि कथा सांगणारा हा सिनेमा आहे. ‘गुड लक जेरी’ ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) वर 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आनंद एल राय निर्मित आणि सिद्धार्थ सेन दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगढ आणि पंजाबमध्ये पूर्ण झाले आहे.

Exit mobile version