Jay Jay SwamiSamarth तांत्रिक एकनाथने उगारली स्वामींवर कुर्हाड, पहा नेमकं काय होणार ‘दत्त जयंती विशेष भागात’

Jay Jay SwamiSamarth   तांत्रिक एकनाथने उगारली स्वामींवर कुर्हाड, पहा नेमकं काय होणार ‘दत्त जयंती विशेष भागात’

जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठी वरील मालिका अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही मालिका श्री संत स्वामी समर्थ महाराजांवरील काथांवर आधारित आहे. या मालिकेमध्ये अभिनेता अक्षय मुदवाडकर हा स्वामींची मुख्य भूमिका साकारत आहे. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतारच आहेत. नुकताच मालिकेमध्ये एकनाथ नावाच्या एका तंत्रिकांचे आगमन झाले आहे. या एकनाथ तांत्रिकाला चेटूक विद्या येत असते पण त या तांत्रिकाने स्वामींना मारण्यासाठी स्वामींवर चक्क कुर्हाड उचलली आहे.

जय जय स्वामी समर्थ ही मालिका संत स्वामी समर्थ महाराजांवरील काथांवर आधारित ही मालिका आहे. या मालिकेमध्ये रामाचार्य हा स्वामी समर्थ महाराजांचा विरोध करणारा व्यक्ती दाखवला आहे. तो स्वामी समर्थ महाराजांबद्दलचा भक्तांमधील विश्वास कमी करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत असतो. अक्कलकोट मधील पंडित रामाचार्यांचा सहकारी सुमुख हा देखील स्वामीं समर्थ महाराजांचा विरोधक असतो.अलीकडच्या एपिसोडमध्ये सुमुखने इच्छा व्यक्त केलेली असते. की स्वामी समर्थ महाराजांना शह देण्यासाठी आणि कोणतरी चेटूक विद्या करणारा तांत्रिक अक्कलकोट मध्ये आला पाहिजे. यावर स्वामी समर्थ महाराज सांगतात की सुमुखचीपण उच्च पूर्ण होईल. त्यानंतर या एकनाथ तंत्रिकांचे आगमन होते. या तांत्रिकाची दहशद संपूर्ण अक्कलकोटच्या पसरते. सुमुख आणि रामाचार्य हे या तांत्रिकाला सांगून स्वामी समर्थ महाराजांवर चेटूक विद्या करायला सांगतात. एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. एकनाथच्या या कृती आणि प्रयत्न स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर अपयशी ठरतात. त्यावर चिडून हा तांत्रिक स्वामी समर्थ महाराजांवर चक्क कुर्हाड ऊगारतो. त्याच क्षणी स्वामी त्याला दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देतात.

हे दत्त जयंती विशेष भागात आपल्याला पाहाला मिळणार आहे.स्वामी समर्थ हे साक्षात दत्त महाराजच आहेत. तसेच दत्त जयंती जवळ येत असल्यानं आता जय जय स्वामी समर्थ मालिकेतही प्रेक्षकांना दत्तांचं दर्शन घडणार आहे. या अगोदरही या मालिकेत स्वामींनी भक्त चोळप्पांना दत्तांचं दर्शन घडवलं होत. पण आता स्वतःच्या तांत्रिक विद्येने संपन्न आणि ज्याची सगळ्यांवर दहशत आहे. असा तांत्रिक एकनाथ गुरुंचा स्विकार करुन स्वामींना शरण जाईल का हे पाहण्यासारखं असेल. हे दत्त जयंती विशेष भागात आपल्याला पाहाला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

MVA Live : १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा, मविआने केली घोषणा

मिर्झापूर सिझन ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही?”

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version