spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘राडा’ सिनेमात झळकणार ‘जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण

योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूकसह एका लव्हेबल अंदजात ती प्रेक्षकांना दिसणार आहे

‘राडा’ सिनेमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. साऊथच्या सिनेमांसारखा ऍक्शन, कॉमेडी सोबत रोमँसने परिपूर्ण असा सिनेमा म्हणून राडा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या पोस्टरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे आणि त्यात प्रेक्षकांसाठी अजून एक सुखद बातमी आता समोर येत आहे आणि ती बातमी म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री योगिता चव्हाण ‘राडा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ या चित्रपटात योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूकसह एका लव्हेबल अंदजात ती प्रेक्षकांना दिसणार आहे. तर योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या हा भव्यदिव्य ‘राडा’ या ऍक्शनपट पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले लिहिला असून चित्रपटातील गाणी जाफर सागर आणि विष्णू थोरे यांनी लिहिली आहेत. तर दिनेश अर्जुना यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली असून धुरा मयुरेश केळकर यांनी ती गाणी गायली आहेत. हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

या भव्य ऍक्शनपटात योगिता सोबत आणखी कोणते कलाकार दिसणार, हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एका रावडी आणि नव्या लुकमध्ये अभिनेत्री योगीता चव्हाण लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे. हे ही वाचा:

 हे ही वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दुःखातील सोबत्याची अनोखी कहाणी

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी, किरीट सोमय्या यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss